पान २ पट्टा
गणेशभक्तांसाठी पाणी, अल्पोहार
पनवेल (बातमीदार): करंजाडे परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान भाविकांसाठी स्वामी समर्थ नित्य सेवा संस्थेच्या वतीने पाणी, अल्पोहार वाटप करण्यात आले. या उपक्रमाला गणेशभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत ढोल-ताशांच्या गजरात हजारो भाविक सहभागी झाले होते. भक्तिभावाने दंग झालेल्या भाविकांच्या सोयीसाठी संस्थेच्या सदस्यांनी पाणी व अल्पोहाराचे वाटप केले. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सुनील जांभळे, सचिव संदीप चव्हाण, खजिनदार रामेश्वरी जांभळे, उपाध्यक्ष प्रिया हेमंत मालंडकर, उपसचिव राजेश वायंगणकर, सल्लागार विश्वास चव्हाण, सदस्य विनायक अर्जुन मडवी, गणेश खंदारे, विलास कांबळे, मयूर गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाचे पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी कौतुक केले.
ः-------------------------------------------
हरवलेली बॅग प्रवाशांच्या स्वाधीन
कर्जत (बातमीदार)ः कर्जतहून दुपारी १ वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी लोकलच्या पहिल्या वर्गाजवळील जनरल डब्यात एक बॅग राहिली होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिस शिपाई गोरख मासाळ, महिला शिपाई पूजा मने यांनी पाहणी केली असता लॅपटॉप, कीबोर्ड, माऊस, स्मार्ट वॉच तसेच महत्त्वाची कागदपत्रे असे ९० हजारांचे साहित्य होते. तपासणीदरम्यान शिवा डाकुआ (वय ३४) यांची ही बॅग असल्याचे समजले. त्यानुसार कर्जत रेल्वे पोलिसांनी त्यांची चौकशी केली. तसेच खात्री पटल्यानंतर बॅग त्यांच्या स्वाधीन केली. सर्व वस्तू सुरक्षित परत मिळाल्याबद्दल डाकुआ यांनी कर्जत रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी खाडे यांच्यासह सर्व पोलिसांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.