पितृपक्षात भाज्यांचे दर वधारले
पितृपक्षातच भाज्यांनी गाठली शंभरी
आवक कमी झाल्याने दरवाढ, पावसाचा फटका
वाशी, ता. ८ (बातमीदार)ः पितृपक्ष सुरू असल्याने पारंपरिक जेवण घरोघरी बनवले जाते. यासाठी काही खास भाज्या बनवाव्या लागतात. त्यात प्रामुख्याने शेंगभाज्यांना अधिक मागणी असते, मात्र गणेश विसर्जनानंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजारात भाज्यांची आवक फारच कमी झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांच्या किमती किलोमागे शंभरीपार गेल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. पावसाच्या लहरीपणाचा सर्वात जास्त फटका भाज्यांना बसला आहे. त्याचाच परिणाम म्हणून आवक कमी झाली आहे. एपीएमसी बाजारात नियमित ६०० गाड्यांची आवक होत असते. आता बाजारात ४०० ते ४५० गाड्यांची आवक होत आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांचा तुटवडा असल्याने भाव वधारले आहे. पितृपक्षात वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात. प्रामुख्याने गवार, भोपळा, चवळी, भेंडी, तोंडली, शेवगा, घेवडा भाज्या लागतात, पण आवक कमी असल्याने त्यांचे भाव वाढले आहेत.
----------------------------------
घरखर्च भागवताना कसरत
- उत्तरांखड, हिमालच प्रदेश, पंजाब येथून एपीएमसीत वाटाणा येतो, पण पावसाने जोर धरल्याने त्याचे भाव वधारले आहेत, तर नाशिक, सातारा, पुणे येथून भाज्या येत आहेत, पण पावसामुळे खराब होण्याचे प्रमाण अधिक असल्याने घाऊक बाजारापेक्षा दुपटीने किरकोळ बाजारात विक्री होत आहे.
- गणेश विसर्जनानंतर काही भाज्या ४० ते ५० रुपये किलोच्या घरात होत्या. त्याच भाज्या आता किरकोळ बाजारात ८० ते १०० रुपये किलो झाल्या आहेत. त्यामुळे भाज्या खरेदी करताना गृहिणींना घरखर्च भागवताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
-------------------------------------
एपीएमसीत भाज्यांची आवक कमी प्रमाणात आहे. त्यामुळे भाव वधारले आहे. डिसेंबरपर्यंत अशीच तेजी राहण्याची शक्यता आहे.
- के. डी. भाळके, व्यापारी एपीएमसी मार्केट
----------------------------
घाऊक बाजारातील भाव
भाजीचे प्रकार प्रतिकिलो
काकडी १४ ते २०
टॉमटो १६ ते २०
फरसबी ५० ते ६०
शेवगा ३० ते ४०
गाजर १६ ते १८
वाटाणा ६० ते १३०
फ्लॉवर १२ ते १४
वांगी २० ते २४
गवार ६० ते ७०
दुधी ३० ते ४०
पालक ८ ते १०
मेथी (जुडी) ७ ते ८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.