६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान
‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून मोफत तपासणी
साडेतीन लाख नागरिकांना लाभ; सहा हजार जणांचे रक्तदान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून राबवण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये २८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर यादरम्यान ७१५९ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांतून तब्बल तीन लाख २६ हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने आणि विविध आरोग्य संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे लाखो नागरिकांपर्यंत मोफत आरोग्यसेवेचा लाभ पोहोचला.
तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या नऊ हजार ९६० रुग्णांना तज्ज्ञांकडे पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले. तसेच, नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली असून, ९५ रक्तदान शिबिरांतून एकूण सहा हजार ८६२ जणांनी रक्तदान केले. या अभियानात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये तसेच धर्मादाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. राज्यभरातील मोठ्या संख्येतील गणेश मंडळांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य करून लोकाभिमुख उपक्रम अधिक परिणामकारक करण्यास हातभार लावला.
एकूण आरोग्य शिबिरे : ७,१५९
एकूण लाभार्थी रुग्ण : ३,२६,००१
एकूण पुरुष लाभार्थी : १,५६,५६०
एकूण महिला लाभार्थी : १,४१,१०८
लहान बालक लाभार्थी : २८,३३३
संदर्भित रुग्ण (पुढील उपचारासाठी पाठवलेले) : ९,६६०
एकूण रक्तदान शिबिरे : ९५
एकूण रक्तदाते : ६,८६२
जिल्हानिहाय सर्वाधिक योगदान
सर्वाधिक शिबिरे : सोलापूर - १२३६
सर्वाधिक रुग्ण तपासणी : सोलापूर - ६२,१८१
सर्वाधिक संदर्भित रुग्ण : पुणे - १५९९
सर्वाधिक रक्तसंकलन : पुणे - १६५०
बालकांचा सर्वाधिक सहभाग : पुणे - ७८५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.