मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी राजिपचा पुढाकार
ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचे बिगुल
करूळ येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत मार्गदर्शन
अलिबाग, ता. ८ (वार्ताहर)ः ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायतराज संस्थांचे योगदान आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी रायगड जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांसाठीची कार्यशाळा सोमवारी (ता. ८) घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रीय ग्रामीण विकास योजना यशदा पुणेचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी प्रास्ताविक करताना मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी अभियानात एकूण आठ घटकांचा समावेश असून, या सर्वांच्या विकासासाठी या अभियानात प्रयत्न करण्याच्या सूचना या वेळी दिल्या. या अभियानांतर्गत १०० दिवसांच्या कालावधीत आपल्याला जास्तीत जास्त काम करायचे आहे. या अभियानातून वेळेत कामांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सुशासन व सशक्त ग्रामपंचायत तयार करायची आहे. सध्या जिल्ह्यातील ५०७ ग्रामपंचायतींमध्ये सेतू केंद्र सुरू असून, ग्रामस्थांना जातीचे व उत्पन्नाचे दाखले देण्यासाठी या ग्रामपंचायती सक्षम करण्यात आल्या आहेत. मनरेगामधून प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत एक एकर जागेत बांबूची लागवड केल्याचे सांगितले. तर रायगड जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायती चांगल्या स्थितीत असून, शासन स्तरावरील कामांमध्ये अग्रेसर असल्याचे मुख्य मार्गदर्शक मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले.
------------------------------
समन्वयाने कामे करा - गोगावले
केवळ बक्षिसासाठी नाही तर ग्रामीण भागाच्या विकासातून देशाच्या विकासालाही हातभार लावण्यासाठी सगळ्यांनी काम करायला हवे. प्रत्येक योजनेची माहिती ही गावातील प्रत्येक ग्रामस्थाला देऊन त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न अभियानांतर्गत करायचा आहे. ग्रामसेवक व सरपंचांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन समन्वयाने या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी काम करावे, असे रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.
-------------------------------
विकासासाठी सकारात्मक पाऊल - तटकरे
या अभियानातून सर्वांना सहभागी करून ग्रामीण भागाच्या विकासासाठी उचललेले सकारात्मक पाऊल आहे. शासनाकडून येणाऱ्या निधीमधून गावाचा विकास करणे हे प्रत्येक ग्रामपंचायतीसमोर आव्हान आहे. गावचा विकास होणार असल्याने स्पर्धात्मक अभियान राबवणे चांगले आहे. दुर्लक्षित ग्रामपंचायतींना या अभियानाअंतर्गत सक्षम करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.