ठाण्यातील जैन मंदिरातील खजिनदाराला धमकावून केली मारहाण..

ठाण्यातील जैन मंदिरातील खजिनदाराला धमकावून केली मारहाण..

Published on

जैन मंदिरातील खजिनदाराला मारहाण
ठाणे, ता. ८ (बातमीदार) : भररस्त्यात एका व्यावसायिकाला धमकावत मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. ८) सकाळी टेंभी नाका परिसरात घडली. अशोक कुमार सरदारमल पारेख असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते जैन मंदिरात खजिनदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ट्रस्टच्या हिशोबात सुरू असलेल्या अफरातफरीबाबत आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्याने ट्रस्टमधील कोणीतरी हा हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी अशोक कुमार यांनी ठाणे नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

अशोक कुमार सरदारल पारेख हे सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास टेंभी नाका येथून पायी जात असताना एका टोळक्याने त्यांना भररस्त्यात अडवून मारहाण केली. अशोक कुमार यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. या हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याआधीही त्यांना काही जणांनी मेसेज पाठवून धमकावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला दाद न दिल्याने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Marathi News Esakal
www.esakal.com