ठाण्यात रंगणार वक्तृत्व स्पर्धा
ठाणे, ता. ८ (बातमीदार) : राज्यभरातील महाविद्यालयीन विश्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी, पाच दशकांची परंपरा असलेली ठाण्यातील कै. नी. गो. पंडितराव वक्तृत्व स्पर्धा यंदा शनिवारी (ता. २७) आणि रविवारी (ता. २८) होणार आहे. श्री समर्थ सेवक मंडळ या संस्थेतर्फे नी. गो. पंडितराव यांच्या स्मरणार्थ होणाऱ्या स्पर्धेचे यंदाचे ५७वे वर्ष आहे. स्पर्धा कनिष्ठ आणि पदवी महाविद्यालयीन अशा दोन गटांत होणार असून, विजेत्यांसाठी एकूण २४ हजार रुपयांचे पारितोषिक आहे.
स्पर्धा नियोजित विषय (१० मिनिटे) आणि आयत्या वेळेचा विषय (तीन मिनिटे) अशा दोन भागांत घेतली जाईल. प्रत्येक गटासाठी स्वतंत्र पारितोषिके आहेत. प्रथम क्रमांकासाठी सहा हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी तीन हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये, तर उत्तेजनार्थ एक हजार रुपये दिले जातील. प्रत्येक महाविद्यालयातून एका गटात पाच विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धा शिवदौलत सभागृह, श्री हनुमान व्यायामशाळा, गडकरी रंगायतन समोर, ठाणे येथे शनिवारी (ता. २७) दुपारी २ वाजल्यापासून सुरू होईल. पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (ता. २८) दुपारी ४ वाजता होईल. ठाणे आणि मुंबईबाहेरच्या स्पर्धकांसाठी विनामूल्य निवास आणि एक वेळचा प्रवास खर्च दिला जाईल, अशी माहिती स्पर्धा समितीचे चिटणीस डॉ. चैतन्य साठे यांनी दिली. स्पर्धेविषयी अधिक माहिती व अर्जासाठी श्री समर्थ सेवक मंडळ ९९८७९०६२०६ / ९८२१५७२४२७, ssmthane@gmail.com येथे संपर्क साधावा, असे आवाहन स्पर्धा समितीने केले आहे.
पदवी महाविद्यालयीन गटासाठी विषय
समाज माध्यम - अभिव्यक्ती आणि उत्पन्न यांची अनोखी संधी, त्रिभाषा सूत्री - गरज किती, राजकारण किती?, ट्रम्प यांची चाल - भारतापुढील आपत्ती की प्रगतीची सुवर्णसंधी?, पन्नाशी - आणीबाणीची आणि ‘शोले’ची आणि संत ज्ञानेश्वर - साडेसातशे वर्षांचा समृद्ध वारसा.
कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी विषय
महाराष्ट्राचे ऐतिहासिक ऐश्वर्य - सह्याद्रीतील गडकिल्ले, सायबर फसवणूक - एक नवीन भस्मासूर, लक्ष्य अनंतापलिकडले - भारताची अंतराळ झेप, माझ्या नजरेतील समृद्धीचा महामार्ग, आणि टेस्ट क्रिकेटचा थरार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.