गणेशोत्सवानंतरही मुंबईतील रस्त्यांमध्ये खड्ड्यांचे विध्न
गणेशोत्सवानंतरही मुंबईत खड्ड्यांचे विघ्न
तातडीने खड्डे भरण्याची राष्ट्रवादीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : गणेशोत्सव संपल्यानंतरही मुंबईतील रस्ते खड्डेमय झाले आहेत. गणपती विसर्जन काळात रस्त्यांतील खड्ड्यांचे विघ्न दूर केले जाईल, असे पालिकेने म्हटले होते. मात्र रस्त्यांमध्ये सर्वत्र खड्डेच असल्याचे दिसून येत आहे. त्याचा नागरिकांना त्रास होत असून खड्डे तातडीने भरण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
संततधार पावसाचा फटका इतर भागांबरोबरच मुंबईच्या रस्त्यांनाही बसला आहे, मात्र ते खड्डे भरले जात नाहीत. काही खड्डे पावसात भरण्यात आले, परंतु त्याचा उपयोग अद्याप झालेला नाही. खड्डे भरण्यासाठी वापरलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मुंबईत खड्डे भरण्याच्या कामाला वेग द्यावा, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.
सर्वाधिक खड्ड्यांची ठिकाणे
मालाड, बोरिवली, अंधेरी पूर्व, भांडुप, मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, चेंबूर, परळ, वडाळा या भागांत, तर भांडुप १,४४५, अंधेरी पश्चिम ६४४, मुलुंड ५८३, खड्डे असल्याच्या तक्रारी आल्याची माहिती पालिकेने दिली आहे. मुंबईत ७,०८३ खड्डे होते. त्यापैकी ५,७१० खड्डे बुजविल्याचा दावा पालिकेने केला आहे.
५४५ कोटींच्या चौकशीची मागणी
मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांची दयनीय स्थिती झाली आहे. रस्ते खड्ड्यांनी व्यापले आहेत. पावसाळ्यात रस्त्यांत पडणारे खड्डे भरण्यासाठी ५४५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा मुंबईकर करदात्यांचा पैसा आहे. या पैशाचा दुरुपयोग होत असून खड्डे आहेत तसेच असल्याने या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी राखी जाधव यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.