एमबीच्या दोन विद्यार्थ्यांना दिलासा

एमबीच्या दोन विद्यार्थ्यांना दिलासा

Published on

एमबीएच्या दोन विद्यार्थ्यांना दिलासा
प्रवेश रद्द करण्याचा महाविद्यालयाच निर्णय रद्द
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः परीक्षेच्या गुणांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी प्रथम वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्याचा नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचा (एनएमआयएमएस) निर्णय उच्च न्यायालयाने नुकताच रद्दबातल ठरवला. तसेच या दोन विद्यार्थ्यांना त्यांची चूक सुधारण्याची एक संधी देण्याचे निरीक्षण न्यायालयाने संस्थेचा निर्णय रद्द करताना नोंदवले. 
विद्यार्थ्यांनी गुण वाढवले नसते, तरी शैक्षणिक वर्ष उत्तीर्ण केल्याचे नमूद करून दोन्ही विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेला बसण्याची आणि निकालांच्या अधीन राहून पुढील अभ्यास करण्याची परवानगी देण्याचे आदेशही न्या. मकरंद कर्णिक आणि न्या. नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने ‘एनएमआयएमएस’ला दिले. याचिकाकर्त्यांनी हे कृत्य करण्याची किंवा त्यात सहभागी होण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे त्यांनी केलेली कृती ही चुकीची असून, ती टाळता आली असती. तथापि याचिकाकर्त्यांना सुधारण्याची एक संधी देणे आवश्यक असल्याचेही खंडपीठाने दोन्ही विद्यार्थ्यांना दिलासा देताना स्पष्ट केले. 

प्रकरण काय? 
याचिकाकर्त्या दोन्ही विद्यार्थ्यांनी ‘एनएमआयएमएस’च्या स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये २०२४-२६ च्या एमबीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. जानेवारीमध्ये झालेल्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षेनंतर, मूल्यांकन पडताळणीसाठी १० मार्च रोजी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका वितरित केल्या, तेव्हा याचिकाकर्त्यांनी त्यांच्या गुणांपुढे १ हा आकडा लिहिला. त्यामुळे त्यांचे गुण ८.६ वरून १८.६ झाले. ही बाब उघडकीस आल्यावर याचिकाकर्त्यांना तिसऱ्या सत्राच्या परीक्षेला बसण्यापासून रोखण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे प्रवेश रद्द केल्याचे सांगण्यात आले. संस्थेचा हा निर्णय नियमांचे उल्लंघन असून, बाजू ऐकून न घेता निर्णय घेण्यात आल्याचा दावा करून दोन्ही याचिकाकर्त्यांनी निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com