मुंबई
विजय केंकरे यांची नाट्य कार्यशाळा
विजय केंकरे यांची नाट्य कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० ः नाटक का? कशासाठी? कोणासाठी आणि कसे करावे? इंटरनॅशनल थिएटरविषयी संवाद, दिग्दर्शनाचे मूलभूत तंत्र आणि अभ्यास आणि तुमच्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी याविषयावर विजय केंकरे यांची नाट्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. श्रीकला संस्कार न्यास आयोजित दोन दिवसीय नाट्य कार्यशाळा २७ व २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ५ यावेळेत शुभमंगल हॉल, डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे. ही कार्यशाळा १६ वर्षावरील सर्व इच्छुकांसाठी असून मराठी रंगभूमीवरील १०० हून अधिक नाटकांचे दिग्दर्शन केलेले विजय केंकरे मार्गदर्शन करणार आहेत. नाव नोंदणीसाठी ९९६७९४८९४२ / ९९२०७६४११९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.