आगीनंतरही गॅस वितरण सुरळीत
आगीनंतरही गॅस वितरण सुरळीत
ओएनजीसीचे स्पष्टीकरण
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १० : ओएनजीसीच्या उरण प्लांटमधील एका वेगळ्या जुन्या लाइनच्या ड्रेन पॉइंटमध्ये आग लागल्याची घटना सोमवारी (ता. ८) घडली. उरण प्लांटमध्ये तैनात असलेल्या ओएनजीसी अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली. यात कोणतीही मालमत्तेची किंवा जीवितहानी झाली नाही. कामावर कोणताही परिणाम झाला नाही, असे स्पष्टीकरण ओएनजीसीतर्फे करण्यात आले आहे.
या आगीमुळे गॅसपुरवठ्यावर संभाव्य परिणाम होईल, अशा चर्चा सुरू होत्या; मात्र या घटनेदरम्यान किंवा नंतर कोणत्याही वेळी ग्राहकांना कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) पुरवठ्यात कोणताही व्यत्यय आलेला नाही, असे ओएनजीसीने स्पष्ट केले आहे. तसेच आगीच्या वेळी कोणत्याही प्रकारे स्फोट झाले नाही. ओएनजीसीच्या उरण प्लांटमधून शहर वितरण नेटवर्कला गॅसपुरवठ्यावर कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहिला. तसेच, प्लांट ऑपरेशन्समध्ये तज्ञता आणि अनुकूलतेची पातळी आणि मजबूत ‘मानक ऑपरेशन प्रक्रिया’ असल्याने अशा घटना कधीही ग्राहकांच्या गॅसपुरवठ्यात व्यत्यय आणण्याचे कारण बनणार नसल्याचे ओएनजीसी प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.
या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग कोणत्या परिस्थितीमुळे लागली, याची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.