गणेशमूर्ती विक्रीतून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम

गणेशमूर्ती विक्रीतून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम

Published on

गणेशमूर्ती विक्रीतून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम
१३ कोटी १३ लाख ८७ हजार २०० रुपयांची कमाई
अलिबाग, ता. १४ (वार्ताहर) ः उमेद अभियानांतर्गत गणपती मूर्ती व्यवसायात महिलांनी पाऊल ठेवून आर्थिक स्थैर्य प्राप्त केले आहे. बचत गटातील महिलांनी १ लाख ६६ हजार ८३३ गणपतीमूर्ती व्यवसायातून १३ कोटी १३ लाख ८७ हजार २०० रुपयांची कमाई केली आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुका गणपती मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पेणमध्ये तयार केलेल्या गणपती मूर्तींना देश, विदेशात मोठी मागणी आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पेण व जिल्ह्यातील इतर तालुक्यातील विविध बचत गटातील महिला या गणपती व्यवसायात सहभागी झाल्या आहेत. महिला बचत गटांनी १ लाख ६६ हजार ८३३ गणपती मूर्ती तयार‌ केल्या असून, यामधील १ हजार ५०० गणपती मूर्ती परदेशात पाठविण्यात आल्या आहेत. गणपती मूर्ती व्यवसायातून १३ कोटी १३ लाख ८७ हजार २०० रुपयांची उलाढाल केली आहे. व्यवसायासाठी उमेद अभियानमार्फत महिला बचत गटांना फिरता निधी तसेच ग्राम संघांना समुदाय गुंतवणूक निधी आणि बँकांमार्फत पतपुरवठा करण्यात आला असून, महिलांच्या या व्यवसायाला गती प्राप्त झाली आहे. या व्यवसायामुळे महिलांच्या हाताला काम मिळाल्यामुळे त्या अधिक सक्षम बनल्या आहेत.
.................
चौकट :
तालुका मूर्तींची संख्या. एकूण उलाढाल रुपयांमध्ये
अलिबाग. १ हजार २७७. ८ लाख १५ हजार रु.
कर्जत. ३ हजार ४५०. ३० लाख ५० हजार रु. खालापूर. १५०. २ लाख ३० हजार. रु.
महाड. ३२०. २ लाख ५० हजार. रु.
माणगाव. ४२०. ३ लाख ४५ हजार. रु.
म्हसळा. ३५८. २ लाख ९६ हजार ५०० रु .
मुरुड. ६५०. १६ लाख २५ हजार. रु.
पनवेल. २२०. ६ लाख ४५ हजार. रु.
पेण. १ लाख ५८ हजार १०२ १२ कोटी २१ लाख ९५ हजार ७००.
पोलादपूर. १३५. १ लाख ६५ हजार. रु.
रोहा. ९८. ६० हजार. रु.
श्रीवर्धन. ४५०. ६ लाख ६५ हजार. रु.
सुधागड. १०० ७० हजार. रु.
तळा. १३८. २ लाख ६० हजार. रु.
उरण. ९६५. ७ लाख १५ हजार. रु.
एकूण विक्री केलेल्या मूर्तींची संख्या : १ लाख ६६ हजार ८३३
एकूण उलाढाल : १३ कोटी १३ लाख ८७ हजार २०० रु.


कोट :
जास्तीत जास्त महिलांनी या व्यवसायात सहभागी होवून या माध्यमातून उपजीविकेच्या नवनवीन संधी निर्माण होऊ शकतात. महिलांनी या व्यवसायातून आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल करावी.
- नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com