हरेश केणींची भाजपला सोडचिठ्ठी

हरेश केणींची भाजपला सोडचिठ्ठी

Published on

हरेश केणींची भाजपला सोडचिठ्ठी
प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा, काँग्रेसमध्ये प्रवेशाची शक्यता
पनवेल, ता. १४ (बातमीदार) ः तळोजा परिसरात भाजपचे नेते हरेश केणी यांनी पक्षाचा प्राथमिक सदस्यत्वपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे.
पूर्वाश्रमीचे शेतकरी कामगार पक्षामध्ये कार्यरत असणारे हरेश केणी यांची तळोजा परिसरामध्ये ताकद आहे. ते पंचायत समितीचे सभापती होते. विशेष म्हणजे, २०१९ला केणी यांनी शेकापकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त करीत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रभाग क्रमांक तीनमधून कमळ चिन्हावर पालिका निवडणूक लढतील, असे वाटत असताना त्यांनी पक्षाला रामराम केला आहे. या वेळी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी केले जात नसल्याची त्यांची तक्रार होती. त्याचबरोबर नुकतीच जिल्हा कार्यकारिणीत त्यांना संधी देण्यात आली नसल्याने पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
-------------------------
तळोज्यात भाजपला आव्हान
तळोजा परिसरामध्ये मुस्लिमबहुल लोकवस्ती आहे. त्यामुळे परिसरातून भाजपला तुलनेत कमी मतदान होते. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी बाळाराम पाटील यांना आघाडी दिली. या गोष्टीमुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपकरिता येथे प्रतिकूल परिस्थिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतून निवडणूक लढवण्याच्या शक्यतेने हरेश केणी यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
------------------------------
स्वगृही परतण्याची शक्यता कमी
हरेश केणी बराच काळ शेतकरी कामगार पक्षामध्ये होते. ते पुन्हा स्वगृही जातील, याची शक्यता कमी आहे. कारण शेकापमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पडली आहे. त्या तुलनेत काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पातळीवर असल्याने काँग्रेसला प्राधान्य देण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com