नियमित अभ्यास करा; नोकरभरतीत यश मिळवा
महापालिका भरती प्रक्रियेसाठी आ. संजय केळकरांनी दिला कानमंत्र
ठाणे, ता. १४ : ठाणे महापालिकेच्या नोकर भरतीमध्ये यश मिळवायचे असेल तर नियमित अभ्यास करा, असा कानमंत्र आमदार संजय केळकर यांनी तरुणांना दिला. महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेतर्फे आणि आमदार केळकर व आमदार निरंजन डावखरे यांच्या संकल्पनेतून ‘द युनिक अकॅडमी’च्या माध्यमातून प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी अनुराधा मंगल कार्यालय, ठाणे येथे झालेल्या या शिबिरात ४००हून अधिक कंत्राटी कर्मचारी व बेरोजगार तरुण-तरुणी उपस्थित होते. या वेळी आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनीही मार्गदशन केले. आम्ही केवळ कामगारांच्या मागण्या पुढे रेटत नाही, तर नोकर भरतीत इच्छुकांना योग्य दिशा दाखवतो, असे या वेळी आमदार केळकर म्हणाले. नियमित अभ्यास, सराव परीक्षा आणि मार्गदर्शन शिबिरांचा लाभ घेतल्यास यश नक्की मिळते. द युनिक अकॅडमी ही संस्था खरोखरच युनिक प्रशिक्षण देणार असून याचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.
आ. डावखरे यांनीही उमेदवारांना महापालिका भरती प्रक्रियेचे बारकावे समजावून सांगत मार्गदर्शन केले. ‘भरतीदरम्यान उमेदवारांचा गोंधळ उडू नये, यासाठी युनिक अकॅडमीचे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरेल,’ असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, संघटनेचे कार्याध्यक्ष महेश कदम यांनी कामगार आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा विश्वास दिला. या वेळी अध्यक्ष दत्ता घुगे, सरचिटणीस अजित मोरे, कोषाध्यक्ष सुधाकर शिंदे यांसह मान्यवर उपस्थित होते.
परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन
शिबिरादरम्यान युनिक अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी भरती प्रक्रियेचे स्वरूप, अभ्यासक्रम, गणित, सामान्य ज्ञान, मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उमेदवारांच्या शंकांचे निरसन करून मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या शिबिरामुळे महापालिका भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना योग्य दिशा मिळाली असून, हा उपक्रम उपयुक्त आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरल्याची प्रतिक्रिया उपस्थित उमेदवारांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.