लोक अदालतीत १४ हजार प्रकरणांचा निपटारा
लोकअदालतीत १४ हजार प्रकरणांचा निपटारा
कल्याण, ता. १५ (वार्ताहर) : जिल्हा पातळीवर आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीतून कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित तसेच वीजचोरीची दाखलपूर्व व प्रलंबित अशी १४ हजार ७९० प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली. महावितरणच्या उपलब्ध सवलतीचा लाभ घेत संबंधित ग्राहकांनी ११ कोटी ५१ लाख रुपयांचा भरणा केला.
कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या तसेच वीजचोरीची दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडवण्यासाठी एकूण एक लाख ६९ हजार ८५८ वीजग्राहकांना नोटीस पाठविण्यात आली होती. त्यापैकी सुमारे १५ हजार ग्राहक उपस्थित होते. महावितरण आणि वीजग्राहक यांच्यात तडजोड होऊन ११.५२ कोटी रुपये इतका भरणा करण्यात आला. यात कल्याण मंडल एकमध्ये ९५ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ४४ लाख ६३ हजार रुपयांची वसुली झाली. कल्याण मंडल दोनमध्ये सात हजार ५५४ प्रकरणे सात कोटी ६२ लाख रुपयांच्या वसुलीने सामोपचाराने मिटवण्यात आली. वसई मंडलात सहा हजार ५५ प्रकरणांच्या निपटाऱ्यातून तीन कोटी २७ लाख रुपयांची वसुली होऊ शकली, तर पालघर मंडल कार्यालयांतर्गत १८ लाख रुपयांचा भरणा करणाऱ्या ३८६ ग्राहकांची प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली.
ठाणे आणि पालघर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने तसेच कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, महावितरणच्या विधी विभागाने लोकअदालत यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.