पनवेलकरांना मिळणार शुद्ध हवा

पनवेलकरांना मिळणार शुद्ध हवा

Published on

वायू प्रदुषणाच्या संकटावर मात
पालिकेकडून १० ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा
पनवेल ता.२० (बातमीदार)ः पालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पनवेल महापालिकेने १० ठिकाणी अत्याधुनिक हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवणार आहे. यानुसार कळंबोली सर्कल येथे यंत्रणा बसवण्याचे काम सुरू झाल्याने शुद्ध हवा मिळणार आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शहरीकरणामुळे लोकसंख्या आणि वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. परिणामी वाहनांमधून होणारे प्रदूषण, विकास कामांमधून उडणारी धूळ आणि औद्योगिक भागांमधून होणारे उत्सर्जनाने हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळली आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, श्वसनाचे आजार, हृदयविकारासारख्या तक्रारी वाढल्या आहेत. या परिस्थितीचा विचार करून पालिकेने शहरातील १० महत्त्वाच्या ठिकाणी हवा शुद्धीकरण यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
-----------------------
कळंबोलीतून शुभारंभ
कळंबोली सर्कल येथे ही यंत्रणा बसवण्याचे काम सुरू झाले आहे. त्यानंतर हिरानंदानी कॉम्प्लेक्स (खारघर), कोपरा गाव, आयजीपीएल नाका (तळोजा), राणी लक्ष्मीबाई चौक, लेबर नाका (कळंबोली), रोडपाली सिग्नल, कामोठे एन्ट्री पॉईंट, एमजीएम हॉस्पिटल समोर, कोळीवाडा पार्किंग (पनवेल) आणि हुतात्मा स्मारक गार्डन (पनवेल) येथे ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
----------------------------
यंत्रणेचे फायदे
हवेतील धूळकण आणि कार्बन खेचून घेऊन त्यावर पाण्याद्वारे प्रक्रिया करते. त्यासाठी यंत्रणेच्या तळाशी पाच हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसवण्यात आली असून दररोज अंदाजे चारशे लिटर पाणी प्रक्रियेसाठी वापरले जाईल. धूळ आणि कार्बनमुळे तयार झालेले अवशेष काही दिवसांनी स्वच्छ केले जातील. या यंत्रणेवर पाणी फवारण्यासाठी कारंजे बसवण्यात आले आहेत.
---------------------------
वृक्षतोडीमुळे चिंत
विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून हिरवाई नष्ट होत झाल्याने पनवेलचे तपमान १६ एप्रिल रोजी ४३.१ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले होते. महाराष्ट्रात त्या दिवशीच्या तापमानातील ही सर्वोच्च नोंद होती. तसेच कळंबोली येथील प्रदूषणाची पातळीही वाढल्याची नोंद झाली होती.
------------------------
पनवेल शहरातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ हवा उपलब्ध करून देणे, ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. अत्याधुनिक हवा शुद्धीकरण यंत्रणेमुळे शहरातील वायू गुणवत्तेमध्ये सुधारणा झाल्याने त्याचा फायदा नागरिकांना होईल.
- स्वरूप खारगे, उपायुक्त, पनवेल पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com