गायत्री विद्यालय परिसरात कचऱ्याचे ढीग
गायत्री विद्यालय परिसरात कचऱ्याचे ढीग
कल्याण, ता. ६ (बातमीदार) : महापालिकेच्या ४ जे प्रभाग क्षेत्रांतर्गत म्हसोबा चौकापासून काही अंतरावर असलेल्या गायत्री प्राथमिक विद्यालयाजवळ रस्त्याकडेला महापालिकेने नागरिकांनी कचरा टाकू नये, यासाठी एक कचरा कुंडी ठेवली आहे; मात्र ही कुंडी सतत ओसंडून वाहत आहे. परिसरात वारंवार कचऱ्याचा मोठा ढीग साचत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, हा प्रकार फक्त एक दिवसापुरता मर्यादित नसून काही दिवसांनी अशीच परिस्थिती निर्माण होते. महापालिकेच्या सफाई यंत्रणेकडून वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने दुर्गंधी पसरते, तसेच मोकाट श्वान आणि डासांचा त्रास वाढल्याचेही ते म्हणतात.
जबाबदार नागरिकांच्या तक्रारीनंतर संबंधित विभागाकडून रस्त्यावर कचरा उचलला जातो, परंतु काही दिवसांत पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवते. महापालिकेने या ठिकाणी नियमित स्वच्छतेची व्यवस्था करावी, कचरा कुंडीची क्षमता वाढवावी, अशीही मागणी रहिवाशांनी केली आहे, तर नागरिकांनीही कचरा हा कचरा गाडीत किंवा कुंडीतच टाकावा, इतरत्र फेकू नये, असे आवाहन प्रशासनाकडून केले जाते.
कोळसेवाडीकडून म्हसोबा चौकाकडे जाणारा हा मार्ग निमुळता असून, रस्त्यावरील जागा कचऱ्याने व्यापल्याने सायंकाळी गर्दीच्या वेळी परिसरात वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होते. तसेच शहरातील अन्य काही भागातही कचरा कुंड्या क्षमतेपेक्षा जास्त भरल्याने रस्त्यावरच कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होऊ लागते. रस्त्यावरच कचरा दिसल्याने परिसराला व परिणामी शहराला बकालपणा येतो. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून स्वच्छतेसाठी चाललेली महापालिकेची धडपड व्यर्थ ठरून शहरात पुन्हा एकदा कचऱ्याचा प्रश्न उभा राहू शकतो.
व्यापाऱ्यांनी पाळावी शिस्त
परिसरातील काही बेशिस्त नागरिक व काही व्यापारी प्लॅस्टिक, थर्मोकोल व इतर प्रकारचा कचरा सदर कचरा कुंडी परिसरात रात्रीच्या सुमारास आणून टाकतात. त्यांनी हा कचरा इतरत्र पसरवू नये, स्वतःमध्ये स्वच्छतेची शिस्त लावावी, अशाही सूचना सुज्ञ नागरिकांकडून केल्या जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.