मुंबई
मोबाईल फोन चोरीला
मोबाईल फोन चोरीला
ठाणे, ता.६: ठाणे रेल्वे स्थानक फलाट क्रमांक १ समोरील तिकीट काउंटरच्या मोकळ्या जागेत झोपी गेलेल्या मीरा भाईंदर येथील संदीप सिंह यांच्या पॅन्टमधील दहा हजारांचा मोबाईल फोन चोरीला गेला. हा प्रकार रविवार (ता.५) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास समोर आला. सिंह हे रविवारी रात्री कोल्हापूर येथे निघाले होते. मात्र रात्री तेथे जाण्यासाठी गाडी नव्हती. त्यावेळी हा प्रकार समोर आला. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.