पालिकेच्या प्रभागरचनेवर शिक्कामोर्तब
पालिका निवडणुकीचे बिगुल वाजणार
नवी मुंबईत १११ सदस्य, २८ प्रभागांवर शिक्कामोर्तब
वाशी, ता. ७ (बातमीदार)ः नवी मुंबई पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागरचनेची अंतिम अधिसूचना राज्य शासनाने सोमवारी (ता. ६) जाहीर केली आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ अंतर्गत कलम ५(३) अन्वये राज्य शासनाच्या मंजुरीनंतर प्रभागांची अंतिम संख्या आणि रचना निश्चित केली आहे. त्यानुसार १११ नगरसेवक, तर २८ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.
राज्य शासनाच्या नियुक्त अधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर ही अधिसूचना प्रसारित करण्यात आली आहे. याआधी २२ ऑगस्ट २०२५ रोजी प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर हरकती, सूचना घेण्यात आल्या होत्या. जवळपास अडीच हजार हरकती नोंदवल्या गेल्या. विष्णुदास भावे नाट्यगृहात हरकती, सूचनांवर सुनावणीनंतर अंतिम प्रभागरचनेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. त्यानुसार अंतिम प्रभागरचना जाहीर झाली आहे. आता अंतिम प्रभागरचनेवर कोणतीही हरकत सूचना किंवा अनुषंगाने सुनावणी नियमांनुसार घेण्यात आली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे, तर राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार ही अंतिम प्रभागरचना आगामी सार्वत्रिक निवडणुकीत लागू राहणार आहे.
--------------------------------------
प्रभागरचनेतील बदल
- नवी मुंबई महापालिकेच्य प्रभाग क्रमांक १ मध्ये असणारा भाग प्रभाग क्रमांक २ मध्ये गणपतीपाडा घेण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक १४ मध्ये असणारा पावणे गाव हा परिसर वगळण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नेरूळ गावाचे विभाजन करण्यात आले होते. सर्वात जास्त हरकती आल्या होत्या. - नेरूळ गाव प्रभाग क्रमांक २४ मध्ये टाकण्यात आला आहे. जुईनगर गावांमध्ये १८ नंबर प्रभागात होता. ता परिसर २२ नंबर प्रभागात टाकण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे बेलापूरमधील किल्ले गावठाणचा परिसर प्रभाग क्रमांक २६ मध्ये होता. तो प्रभाग २७ मध्ये आहे.
--------------------------------------
नवी मुंबई महापालिकेची प्रभागरचना भाजप, शिवसेना शिंदे गटासाठी सोईस्कर आहे. दोन्ही पक्ष ‘तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो’ असे दाखवत आहे, पण नवी मुंबईचा महापौर हा काँग्रेसच्या टेकूशिवाय कधीच बसला नाही. आजपर्यंतचा हा इतिहास आहे.
- रवींद्र सावंत, काँग्रेस प्रवक्ते
----------------------------------------
महापालिकेच्या अंतिम प्रभागरचनेमध्ये काही दुरुस्त्या केलेल्या आहेत. काही दुरुस्त्या करण्यात आलेल्या नाहीत. ठरावीक राजकीय पक्षांच्या फायद्यासाठी प्रभागरचना तयार करण्यात आलेली आहे. नियम धुडकावून निवडणूक चोरण्याचा प्रयत्न आहे. याविरोधात न्यायालयात दाद मागू.
- सागर नाईक, माजी महापौर भाजप नेते
-------------------------------
केंद्र, राज्यात सत्तेत असणाऱ्या सरकारने प्रभागरचना ही त्यांच्या मनमानीप्रमाणे केलेली आहे. एवढ्या प्रमाणात हरकती घेतल्यांनतर किरकोळ बदल करण्यात आलेला आहे. अति झाल्यांवर त्यांची एक दिवस माती होणार आहे. जनता ही आमच्याबरोबर असल्याचे जनता निवडणुकीत दिसून येईल.
- प्रवीण म्हात्रे, जिल्हाध्यक्ष, ठाकरे गट
-----------------------------------
नवी मुंबई महापालिकेच्या अंतिम प्रभागरचना ही निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणेच झालेली आहे. विरोधकांच्या अपेक्षेप्रमाणे प्रभागरचना नसल्यामुळे बिनबुडाचे आरोप करत आहे.
- अनिकेत म्हात्रे, शिवसेना शिंदे गट
---------------------------
आम्ही जनतेची कामे केलेली आहे. आम्ही प्रभागरचनेला घाबरत नसून निवडणुकीला सामोरे जाणार आहे. ज्या उमेदवारांनी पक्षांतर केलेले आहे. ते प्रभागरचनेला घाबरत आहे.
- नीलेश बाणखेले, मनसे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.