जेएनपीए बंदरात २३ कोटीचा ई कचरा जप्त
जेएनपीए बंदरात २३ कोटीचा ई-कचरा जप्त
उरण, ता.७ (वार्ताहर) ः बेकायदेशीरपणे विदेशातून चार कंटेनरमधून ॲल्युमिनियमच्या नावाखाली आयात करण्यात आलेला २३ कोटी किमतीचा जुने आणि वापरलेले लॅपटॉप, सीपीयू, मदरबोर्ड, प्रोसेसर चिप्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक असा ई-कचऱ्याचा साठा महसूल गुप्तचर संचालनालयाने शनिवारी (ता.४) जप्त केला आहे. याप्रकरणी सुत्रधार असलेल्या सुरतमधील एका कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे.
सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या आणि प्रतिबंध असतानाही जेएनपीए बंदरात ॲल्युमिनियमच्या नावाखाली चार कंटेनरमधुन हा ई-कचरा आयात करण्यात आला होता. याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई महसूल गुप्तचर संचालनालयाने संशयित चारही कंटेनर ताब्यात घेऊन तपासणी केली. या तपासणीत ॲल्युमिनियम ट्रीट स्क्रॅप''च्या नावाखाली भारतात ई-कचरा बेकायदेशीरपणे आयात केला असल्याची बाब समोर आली. यामध्ये एकूण१७, ७६० जुने आणि वापरलेले लॅपटॉप, ११३४० मिनी/बेअरबोन सीपीओ ७,१४० प्रोसेसर चिप्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक घटक जप्त करण्यात आले आहेत. सीमाशुल्क कायदा, १९६२ च्या कलम ११० तरतुदीनुसार जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत २३ कोटीच्या घरात असल्याची माहिती डीआरआय विभागाकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी सुत्रधार असलेल्या सुरतमधील एका कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीच तस्करीचे नियोजन, खरेदी आणि वित्तपुरवठा करण्यात सक्रियपणे सहभागी असल्याचे सांगितले. सरकारी धोरणानुसार सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणीय सुरक्षितता धोक्यात येते. अशा प्रतिबंधित वस्तूंची भंगार म्हणून विल्हेवाट लावायची असते. मात्र, अशा बेकायदेशीर मालाची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.