रेल्वेचे चार नवे प्रकल्प मंजूर; विदर्भाला मोठा फायदा

रेल्वेचे चार नवे प्रकल्प मंजूर; विदर्भाला मोठा फायदा

Published on

राज्यात रेल्वेचे दोन नवे प्रकल्प
विदर्भाला मोठा फायदा; २४,६३४ कोटींची तरतूद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारतीय रेल्वेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाचे चार मोठे पायाभूत प्रकल्प मंजूर करण्यात आले असून, त्यासाठी तब्बल २४ हजार ६३४ कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यापैकी दोन प्रकल्प महाराष्ट्राशी संबंधित आहेत.
रेल्वे मंत्रालयाचे नवे प्रकल्प महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड या चार राज्यांतील १८ जिल्ह्यांमध्ये राबवले जाणार आहेत. त्यामुळे भारतीय रेल्वे प्रणालीत ८९४ किमीच्या नव्या मार्गिकांचा समावेश होणार आहे. त्यात राज्यातील वर्धा-भुसावळ तिसरी-चौथी मार्गिका (३१४ किमी) तसेच गोंदिया-डोंगरगड चौथ्या मार्गिकेचा (८४ किमी) समावेश आहे. याशिवाय अन्य दोन प्रकल्पांमध्ये वडोदरा-रतलाम तिसरी आणि चौथी मार्गिका (२५९ किमी) आणि इटारसी-भोपाळ-बिना चौथी (२३७ किमी) आहेत. या नव्या मार्गांमुळे प्रवासी वाहतुकीसह कोळसा, सिमेंट, धान्य आणि स्टील यांसारख्या वस्तूंची वाहतूक गतिमान होईल. तसेच दरवर्षी ७८ दशलक्ष टन अतिरिक्त मालवाहतूक शक्य होईल, असे रेल्वे मंत्रालयाचा अंदाज आहे.
---
‘प्रधानमंत्री गतिशक्ती’अंतर्गत अंमलबजावणी
सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी ‘प्रधानमंत्री गतिशक्ती’ योजनेंतर्गत होणार आहे. या योजनेचा उद्देश देशातील वाहतूक आणि लॉजिस्टिक क्षेत्रात समन्वय साधून पायाभूत सुविधांचा जलद विकास करणे हा आहे. या प्रकल्पांमुळे सुमारे तीन हजार ६३३ गावे आणि ८५ लाखांहून अधिक लोकसंख्या थेट लाभार्थी ठरणार आहे.
---
पर्यावरणीय आणि आर्थिक फायदा
रेल्वे मंत्रालयाच्या मते, या प्रकल्पांमुळे दरवर्षी २८ कोटी लिटर इंधनाची बचत आणि १३९ कोटी किलो कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात घट होईल. ही घट म्हणजे जवळपास सहा कोटी झाडे लावण्याइतके असेल.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com