नवी मुंबई विमानतळाचे मोदींच्या हस्ते आज उद्‍घाटन

नवी मुंबई विमानतळाचे मोदींच्या हस्ते आज उद्‍घाटन

Published on

नवी मुंबई विमानतळाचे मोदींच्या हस्ते आज उद्‍घाटन
दोन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ७ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्‍घाटन आज (ता. ८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी नवी मुंबई पोलिस दलाने तब्बल दोन हजारांपेक्षा जास्त फौजफाटा तैनात केला आहे. विशेष म्हणजे विमानतळ परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अवजड वाहनांवर पोलिसांनी बंदी घातली असून, वाहतूकमध्ये बदल केला आहे.
उलवे येथे सुमारे १,१६० हेक्टरवर उभारण्यात आलेले देशातील पहिले ग्रीन फिल्ड विमानतळ सेवेत येणार आहे. मोदींच्या हस्ते या विमानतळाच्या उद्‍घाटनानंतर भव्य सोहळा होणार आहे. या सोहळ्यामध्ये लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याची घोषणा मोदींकडून होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा सोहळा अधिक नेत्रदीपक होण्यासाठी भाजप आणि शिवसेना महायुतीने कंबर कसली आहे. सुमारे ५० हजार नागरिक या कार्यक्रमाला येण्याची शक्यता आहे. त्या दिशेने पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी यांनी जोर लावला आहे, तर नवी मुंबई परिसरातून ऐरोलीचे आमदार आणि वनमंत्री गणेश नाईक आणि बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासहित डझनभर मंत्री आणि केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने महायुतीतर्फे शक्तिप्रदर्शन होणार आहे.
...
शेतकऱ्यांबद्दल मोदी काय बोलणार?
काही दिवसांपूर्वी सोलापूर आणि धाराशिव या भागात झालेल्या पूरस्थितीमध्ये हजारो एकर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. या धर्तीवर मोदी काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com