लघु,मध्यम उद्योगांसाठी १४ ऑक्टोबरला बैठक

लघु,मध्यम उद्योगांसाठी १४ ऑक्टोबरला बैठक

Published on

लघु, मध्यम उद्योगांसाठी १४ ऑक्टोबरला बैठक
पालघर, ता. ८ (बातमीदार) ः एसएमई चेंबर ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता. १४) दुपारी दोन वाजता टिमा सभागृह, एमआयडीसी बोईसर पश्चिम, पालघर येथे लघु, मध्यम उद्योगांसाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाला फेडरेशन ऑफ इंडियन एसएमई असोसिएशन्स, एसएमई एक्स्पोर्ट प्रमोशन काउन्सिल, टिमा आणि एसएमई इंडस्ट्रीयल पार्क्स ऑफ इंडिया यांचे सहकार्य लाभणार आहे.
या परिषदेचे उद्घाटन विजू शिरसाट, उद्योग सहसंचालक कोकण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार असून निर्यातवृद्धीसाठी राज्य शासनाच्या असलेल्या विविध योजनांची माहिती त्या आपल्या भाषणात देणार आहेत. चंद्रकांत साळुंखे संस्थापक अध्यक्ष, एसएमई चेंबर ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट असोसिएशन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेमध्ये सुरजित त्रिपाठी (उपमहाप्रबंधक (व्यवसाय व संचालन), स्टेट बँक ऑफ इंडिया, ठाणे) हे उत्पादन व निर्यात क्षेत्राच्या विकासासाठी एसबीआयची भूमिका, वरिष्ठ कार्यकारी अधिकारी लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स हे लोम्बार्डकडून उद्योगांसाठी उपलब्ध विमा योजना, जोखीम व्यवस्थापन आणि एमएसएमईसाठी अनुकूलित उपाययोजना, वरिष्ठ कार्यकारी अधिकारी टॅली सोल्यूशन्स हे टॅलीच्या डिजिटल परिवर्तनातील योगदान, जीएसटी सुसंगतता आणि व्यवसाय सुलभतेवर, सौरभ सेठ (महाप्रबंधक, पीव्ही प्रकल्प, ऑर्ब एनर्जी) हे रूफटॉप सोलरद्वारे भारतीय उद्योगांना ऊर्जा, रूफटॉप सोलर प्रकल्प कसे फायदेशीर ठरतात, त्यासाठी उपलब्ध योजना आणि ऑर्ब एनर्जीचे योगदान यावर मार्गदर्शन करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com