दिवसाला पडतात ठाण्यात २० वाहने भररस्त्यात बंद
दिवसाला पडतात ठाण्यात २० वाहने भररस्त्यात बंद
ठरत आहेत वाहतुक कोंडीसाठी डोकेदुखी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे,ता.०८: वाहतुक कोंडीचे शहर अशी ओळख निर्माण झालेल्या ठाणे शहरात दिवस अथवा रात्री अचानक बंद पडण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून वाढले आहेत. हीच वाहनेही आता डोकेदुखी ठरू लागली आहे. भररस्त्यात ती वाहने बंद पडल्यानंतर तत्काळ त्यांना एका बाजूला करण्यासाठी ठाण्यात सक्षम यंत्रणा असली तरी ते वाहन एका बाजूला करेपर्यंत वाहतूक कोंडीत कळत नकळत भर पडत आहे. त्यातच साधारणपणे दिवसभरात सरासरी २० वाहने विविध कारणांनी बंद पडत असल्याची माहिती वाहतूक पोलिस सूत्रांनी दिली आहे.
ठाणे शहरात वाहतुक कोंडी ही पाचवीला पुजलेली आहे. पावसाळ्यात रस्त्यांना पडणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी ही दरवर्षी पावसाळ्यात डोके वर काढते. त्यातच सद्यस्थितीत ठाण्यात विविध विकास प्रकल्पांची कामे जोरात सुरू आहेत. याशिवाय दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या यामुळे वाहतुक कोंडीत ती वाहने भर घालत आहेत. दुसरीकडे वाहने वाढली तरी शहरात अपुरी असलेली वाहन पार्किंगची व्यवस्था यामुळे वाहने रस्त्यांच्या कडेला पार्क केली जातात. त्यातच गॅरेज वाल्यांनी पसरलेले हात पाय हेही कोंडीत भर घालताना दिसत आहे.
दरम्यान ठाण्यात अपघातांची मालिका ही सुरूच आहे. होणाऱ्या अपघातात वाहनांसह त्या वाहनांमधील सांडणारे ऑईल ही प्रामुख्याने कोंडी करताना दिसत आहे. आता, भरधाव वेगाने रस्त्यांवर धावणारी वाहने जुनी झाल्याने अचानक रस्त्यात बंद पडत असल्याने ती वाहने आणखी डोकेदुखी करत पोलिसांसमोर उभी राहत आहेत. त्यातच ही वाहने बाजूला करण्यासाठी जरी यंत्रणा असली तरी ती वाहने बाजूला करेपर्यंत वेळ जातो त्यामुळे त्याचा वाहतुकीवर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे वाहन रस्त्यावर काढताना, ते सुस्थितीत आहे की नाही याची काळजी वाहन चालकांनी घेणे आवश्यक आहे. वाहन सुस्थितीत असेल तरच वाहने रस्त्यावर काढावे असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे.
विविध कारणांनी विविध प्रकारची वाहने बंद पडत आहेत. यामुळे वाहतुकी कोंडीत कळतनकळत भर पडते. ही वाहने तत्काळ बाजूला करण्यासाठी ४ ते ५ क्रेन उपलब्ध आहेत.सध्या दिवसाला सरासरी २०च्या आसपास वाहने बंद पडत आहेत. "
- पंकज शिरसाट, उपायुक्त, वाहतूक विभाग, ठाणे शहर.
बंद पडण्याची कारणे...
प्रेशर पाईप फुटणे, टायर फुटणे, स्टेरिंग रॉड निघणे, बॅटरी डाऊन होणे, डिझेल संपणे, क्लच प्लेट खराब होणे, गिअर खराब होणे , मल्टी एक्सल बंद होणे, गिअर अडकणे, चढणीवर अचानक बंद पडणे आदी कारणे वाहने बंद पडण्याची आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.