पावसामुळे पीवळ सोनं शेतात

पावसामुळे पीवळ सोनं शेतात

Published on

धान्याशिवाय कडू दिवाळी,
पावसामुळे पिवळे सोने शेतात, शेतकऱ्यांचे पीक मोठ्या प्रमाणात नुकसान
भगवान खैरनार, - सकाळ वृत्तसेवा
मोखाडा ता.१२ः यंदा पावसाने हाहाकार केला आहे. तब्बल सहा महीने पाऊस बरसत आहे. त्यामुळे दसरा, दिवाळी मध्ये हाती येणारे खरीपाचे पीक गोंड्यात असुन शेतात आडवे आणि ऊभे आहे. त्यामुळे पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिवाळी सणात खरीपाचे मन्य हाती येणे दुर्मीळ झाले आहे. दिवाळीत सरकारी मदतीची आशाही धुसर आहे. त्यातच गरीब कुटुंबांना सणासुदीला मिळणारा शासनाचा "आनंदाचा शिधा" मिळणार नसल्याचे संकेत सरकार कडुनच मिळाल्याने, शेतकरी आणि शेतमजुरांची दिवाळी यंदा कडु होणार आहे.
दरवर्षी, दसरा किंवा दिवाळीला खरीपाचे पीक खळ्यावर येते. काही तालुक्यांमध्ये पीकाची मळणी होऊन, काही पीकाची विक्री करून, शेतकरी आणि शेतमजूर आपली दिवाळी साजरी करतात. यंदा ४ मे ला सुरू झालेला पाऊस, सहावा महिना सुरू असुनही थांबलेला नाही. त्यामुळे शेतात गोंड्यात आलेले भात पीक, पाऊस सुरू असल्याने शेतातच आडवे होऊन मोठे नुकसान झाले आहे. काही तालुक्यांमध्ये भात पीक पीवळं सोनं होऊन, कापणीला आले आहे. तर काही भागात पावसाने हे पीक आडवे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे दोन्ही बाजुने नुकसानच झाले आहे.
पालघर जिल्ह्यातील बहूंताश विशेषतः आदिवासी तालुक्यांमध्ये एकमेव खरीपाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जिल्ह्यात खरीप पिकाचे १ लाख ७ हजार २५४ हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र, मुख्य पीक असलेल्या भाताचे ७६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. याच पीकाच्या ऊत्पन्नावर लहान, मोठ्या शेतकर्याना, वर्षभराची गुजराण करावी लागते. तर आदिवासी तालुक्यांमध्ये भातासह नागली (नाचणी) आणि वरई या नगदी पीकांचे ऊत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात यावर्षी सरासरी ९२ टक्के खरीपाची पेरणी झाली आहे.

भरपाई मिळण्याची शाश्वती नाही
जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात अजुनही पाऊस सुरूच आहे. त्यामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कापणीला आलेले पीक, शेतातच आडवे झाले आहे. यंदाच्या दिवाळीला, खरीप पीकाच्या धान्याचा घास शेतकर्याच्या ताटात येण्याच्या आशा मावळल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच पीकाच्या नुकसानचे पंचनामे अजुनही पुर्ण झालेले नाही. भरपाई सरकारी मदत, दिवाळीपुर्वी पदरी पडेल की नाही याची शाश्वती शेतकऱ्यांना नाही.

"आनंदाचा शिधा" मिळण्याची आशा धुसर
गतसाली सर्व सणांसाठी शासनाने, गरीब शेतकरी आणि शेतमजुरांना आनंदाचा शिधा दिला होता. त्यामुळे सर्व सणं गोडाधोडाने साजरे झाले. यंदा गणेशोत्सवाला शासनाने आनंदाचा शिधा वाटप केला नाही. तर दिवाळी सणाला देखील आनंदाचा शिधा वाटप केला जाणार नसल्याची वक्तव्ये, महायुती सरकार मधील मंत्र्यांनी केली आहेत. हा शिधा वाटपा बाबत अजुनही शासन स्तरावर कुठलीच हालचाली नाहीत. त्यातच, यंदा खरीपाचा दानाही शेतकर्याच्या ताटात येणार नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी कडु होणार आहे.

शासनाच्या आदेशानुसार कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या माध्यमातून नुकसान ग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत. दोन दिवसात हे पंचनामे पुर्ण करण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर सर्व पंचनामे शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
* आकाश सोळुंखे, तालुका कृषी, अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com