पूरग्रस्तांसाठी मराठी कलाकारांचा पुढाकार

पूरग्रस्तांसाठी मराठी कलाकारांचा पुढाकार

Published on

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी कलाकारांचा पुढाकार
बीडमधील ७०० हून अधिक कुटुंबांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ ः महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील भीषण पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि ग्रामीण जनतेच्या मदतीसाठी कल्याणातील मराठी कलाकारांनी माणुसकीचा हात पुढे केला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कल्याण शाखेच्या माध्यमातून मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांमध्ये ही मदत पोहोचवण्यात आली.

प्रसाद दाणी, ऋतुराज फडके, श्रेयस राजे, सौरभ पात्रुडकर, गौरव कुलकर्णी आणि ललित कुलकर्णी या कलाकारांनी मदतकार्यात सहभाग घेतला. ऋतुराज फडके आणि प्रसाद दाणी यांनी केलेल्या आवाहनाला सुजाण नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. नागरिकांच्या सहकार्याने गोळा झालेल्या मदतीतून बीड जिल्ह्यातील तब्बल ७०० हून अधिक कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. हिंगणी खुर्द, जेबापिंपरी, शिरापूर गात, फुलसांगवी, जांब, साक्षाळपिंपरी, कपिलधारवाडी, तरडगव्हाण, हिवरसिंगा, ढोकवड, आर्वी, मार्कडवाडी, हाजीपूर, गाजीपूर, कमलेश्वर धानोरा, उमरद जहागीर आणि बहादरपूर या गावांमध्ये मदत पोहोचविण्यात आली. आपण गोळा केलेली मदत योग्य हातात पोहोचली पाहिजे, या उद्देशाने सर्व कलाकारांनी स्वतः गावोगावी जाऊन मदतीचे साहित्य पूरग्रस्तांच्या हाती सुपूर्द केले.

ऋतुराज फडके आणि प्रसाद दाणी यांनी अनेक चेहऱ्यांवर हसू फुलविल्याने उपक्रमाला यश लाभल्याची भावना व्यक्त केली. सामान्य माणसाने ठरवले तर तो मोठे परिवर्तन घडवू शकतो, असे सांगून त्यांनी शेतकरी आणि कष्टकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हेच आपले कर्तव्य असल्याचे अधोरेखित केले.

सामाजिक बांधिलकी
‘कलाकार म्हणून ‘माणुसकी’ हाच आमचा धर्म आहे,’ या शब्दांत मराठी कलाकारांनी सामाजिक कार्याप्रती आपला निर्धार व्यक्त केला. या मदतकार्यासाठी थेट व अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्या सर्व नागरिकांचे, संस्थांचे आणि माध्यमांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. भविष्यातही अशा प्रकारचे सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात राबवण्याचा निर्धार या कलाकारांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com