मदतीचे तोरण हेच शिवसेनेचे धोरण

मदतीचे तोरण हेच शिवसेनेचे धोरण

Published on

‘मदतीचे तोरण हेच शिवसेनेचे धोरण’
शिवसेनेकडून पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात
कल्याण, ता. ९ (वार्ताहर): मराठवाड्यातील जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने मोठा मदतीचा हात देण्यात आला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वात ही मदत मोहीम राबवण्यात येत आहे. मराठवाडा येथील जालना, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील एकूण ४५०० पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहोचवली जात आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुका, कुर्ला गाव येथे सिंदपाना नदीकिनाऱ्यावरील एकूण १४ गावांच्या आपद्ग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना गरजेच्या वस्तू असलेल्या किटचे वाटप केले. शिवसेनेच्या या मदतकार्यात कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्त्वाखाली मदत वाटप करण्यात आली. या वेळी उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, माजी नगरसेवक राजन मराठे, डोंबिवली युवासेना अध्यक्ष सागर जेधे, उपतालुकाप्रमुख राहुल गणपुले, युवासेना विधानसभा अध्यक्ष सूरज मराठे आणि संजय निकते आदी पदाधिकारी उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, सचिन मुलुक, स्वप्नील गलधर आणि कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती श्याम सुंदर पडुले यांच्या प्रयत्नातून आणि नियोजनातून हा वाटप कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com