पालघरमध्ये आश्रमशाळेत
दोन विद्यार्थांची आत्महत्या

पालघरमध्ये आश्रमशाळेत दोन विद्यार्थांची आत्महत्या

Published on

पालघरमध्ये आश्रमशाळेत
दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या

वाडा तालुक्यातील आंबिस्ते येथील घटना

वाडा, ता. ९ (बातमीदार) : तालुक्यातील आंबिस्ते या गावात असलेल्या कै. दिगंबर पाडवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. देविदास परशुराम नवले (वय १५) आणि मनोज सीताराम वड (१४, दाेघेही माेखाडा) अशी त्यांची नावे आहेत. या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंत सुमारे ४५० विद्यार्थी असून, आश्रमशाळेत देविदास हा दहावीत, तर मनोज हा नववी इयत्तेत शिकत हाेता. ते बिवळपाडा आणि दापटी येथील रहिवासी हाेते. बुधवारी (ता. ८) रात्रीचे जेवण झाल्यावर सर्व विद्यार्थी झोपी गेले हाेते. मध्यरात्री सुरक्षा रक्षकाला शाळेच्या मागील आवारात काहीतरी झाडाला लाेंबकळत असल्याचे दिसले. त्याने जवळ जाऊन पाहिले असता, त्याला दाेघे जण झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसले. याबाबत त्याने शाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक व इतर शिक्षकांना कळवले. त्यानंतर गावातील पोलिस पाटील, सरपंच यांना माहिती देऊन पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यांना झाडावरून उतरवून वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित साबळे करीत आहेत.
------
दाेषींवर कठाेर कारवाई!
घटनेची माहिती मिळताच जव्हार आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी डाॅ. अपूर्वा बासुर, पालघरचे अप्पर पोलिस अधीक्षक विनायक नरले आणि पोलिस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी घटनास्थळाला भेट दिली. पालघरचे खासदार डाॅ. हेमंत सवरा व भाजपचे नेते प्रकाश निकम यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
-------
मुख्याध्यापक, अधीक्षक निलंबित
भिवंडी येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ या संस्थेची आंबिस्ते येथे आश्रमशाळा आहे. या संस्थेने आत्महत्येची गंभीर दखल घेतली आहे. शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय दाते आणि अधीक्षक राजू सावकारे यांना निलंबित केले आहे, अशी माहिती संस्थेचे विश्वस्त भरत सावंत यांनी सांगितले.
------------------
सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!
संस्थेचे या आश्रमशाळेकडे दुर्लक्ष हाेत असून, या आश्रमशाळेला साधे तारेचे कम्पाउंड असून, तेही अनेक ठिकाणी तुटलेले आहे. त्यामुळे विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत येथील रस्त्यावर असतात, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते गोविंद पाटील यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com