पश्चिम द्रुतगती मार्गावर शर्यतीचा थरार?
पश्चिम द्रुतगती मार्गावर शर्यतीचा थरार?
भरधाव पाेर्शेची दुभाजकाला धडक; दाेघे थाेडक्यात बचावले
मुंबई, ता. ९ : भाईंदरहून अंधेरीकडे निघालेल्या पाेर्शे आणि बीएमडब्ल्यू या आलिशान कारमध्ये गुरुवारी पहाटेच्या सुमारास ‘रेसिंग’चा थरार रंगला. लाेखंडवाला संकुलात सर्वप्रथम पाेहाेचण्यासाठी या दाेन्ही कार ताशी १५० किलाेमीटर धावत असताना गुंदवली मेट्राे स्थानकाजवळ चालकाचे नियंत्रण सुटून पाेर्शे कार दुभाजकाला धडकली. यात चालकासह त्याचा मित्र गंभीर जखमी झाले असून एअर बॅगमुळे त्यांचा जीव थाेडक्यात वाचला. याप्रकरणी पाेर्शे कारचालक निओ साॅन्स (वय २२, रा. मीरा-भाईंदर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त कार(डीएन ०९ क्यू १७७७) निओच्या मालकीची आहे. अपघात घडला तेव्हा तोच कार चालवित होता. त्याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून स्वतःला व मित्राला जखमी केल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपी निओ आणि त्याच्या मित्रावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धडकेमुळे गाडीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. त्यावरून अपघात झाला तेव्हा कारचा वेग १००-१२५ असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. धडकेमुळे एअर बॅग उघडल्याने या दोघांचा जीव वाचला, असेही पोलिसांनी सांगितले.
जोगेश्वरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक इक्बाल शिकलगर यांनी दिलेल्या माहितीनुसार पोर्शेचा अपघात घडला तेव्हा बीएमडब्ल्यू मागे होती. त्यातून प्रवास करणाऱ्या मित्रांनीच निओ आणि अन्य मित्रास रुग्णालयात नेले. या दोन्ही कार वेगात धावत होत्या; मात्र त्यांच्यात शर्यत होती, हे तपासात स्पष्ट झालेले नाही. खड्डा चुकविण्याच्या नादात कारवरील नियंत्रण सुटल्याचा जबाब निओ आणि अन्य मित्राने नाेंदवला आहे. दरम्यान, अपघातानंतर निओची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यात तो दारूच्या नशेत नसल्याचे स्पष्ट झाल्याचे शिकलगर यांनी सांगितले.
----
आरटीओची मदत घेणार!
जखमींच्या जबाबानुसार पाहणी केली असता तेथे खड्डा असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे अपघाताचे कारण स्पष्ट करण्यासाठी आणखी तपासाची आवश्यकता असून त्यासाठी आरटीओच्या तज्ज्ञांची मदत घेणार असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.