आता पालकही मुलांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेऊ शकणार
मुलांच्या सुरक्षेसाठी शाळांचे संकेतस्थळ
पालकांना लक्ष ठेवता येणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः शाळेतील मुलांच्या सुरक्षेवर पालकांना लक्ष ठेवता यावे, यासाठी शिक्षण विभागाने माहिती उपलब्ध करणारे स्वतंत्र अधिकृत संकेतस्थळ सुरू केल्याची माहिती राज्य सरकारने शुक्रवारी (ता. १०) उच्च न्यायालयात दिली. शाळांतील सुरक्षा उपाययोजनांच्या पूर्ततेची माहिती वेळोवेळी अधिक सविस्तरपणे संकेतस्थळावर टाकावी, शाळा प्रशासनाकडे मुलांच्या सुरक्षेबाबत आलेल्या तक्रारी, त्या निवारण्यासाठी उचललेली पावले आणि तक्रारींचे निवारण केल्याबाबतचा तपशीलही संकेतस्थळावर उपलब्ध करावा, असे आदेश न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठाने या वेळी दिले.
दर महिन्याला शाळांनी हा तपशील अद्ययावत करण्याबाबत आणि शाळांना अचानक भेट देऊन उपाययोजनांची अंमलबजावणी होते की नाही, याची पडताळणी करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. त्याच वेळी शालेय मुलांच्या सुरक्षेशी संबंधित उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या शिक्षण विभागाच्या प्रयत्नांबाबतही न्यायालयाने समाधान व्यक्त केले. आतापर्यंत एकूण ९२ हजार ५२९ शाळांनी उपाययोजनांच्या पूर्तता करण्यास सुरुवात केली असून ८८ हजार २५६ शाळांनी पूर्ण तपशील संकेतस्थळावर टाकला आहे. उर्वरित शाळा येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत हा तपशील टाकतील, अशी माहिती अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी खंडपीठाला दिली. हे संकेतस्थळ ५ ऑक्टोबरला कार्यान्वित झाले असून त्यात शाळेचे नाव प्रविष्ट करून कोणीही त्यावर प्रवेश करू शकते. तसेच दर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत सर्व माहिती अद्ययावत करण्याचे आदेश शाळांना दिल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
...
विशेष अधिकारी नियुक्त करावा
न्यायालयाने उपाययोजनांची पूर्तता करणाऱ्या शाळांच्या आकडेवारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शाळांनी कार्यशाळांसारख्या उपक्रमांसदर्भात पालकांना कळवणे आवश्यक आहे. विशिष्ट तारखेनुसार तपशील उपलब्ध करावा लागेल, असे न्यायालयाने नमूद करून पालकांना माहिती देण्यासाठी विशेष अधिकारी नियुक्त करावा आणि उपाययोजनांची पूर्तता झाली की नाही, याबाबत अचानक भेट देऊन पडताळणी करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.