आरक्षणासाठी जिल्ह्यातील बंजारा समाज एकवटला; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आरक्षणासाठी जिल्ह्यातील बंजारा समाज एकवटला; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Published on

आरक्षणासाठी जिल्ह्यातील बंजारा समाज एकवटला; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अलिबाग, ता. ११ (वार्ताहर) : बंजारा तत्सम जमाती बांधवांना हैदराबाद गॅझेटच्या आधारे एसटी आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. १०) जिल्ह्यातील बंजारा समाज एकवटल्याचे पाहायला मिळाले. सकल बंजारा आरक्षण समितीच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांनी अलिबागमध्ये एकत्र येत मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
हैदराबाद गॅझेटच्या आधारे एसटी आरक्षण लागू करण्याच्या मुद्द्यावर समाजनेत्या राजश्री आडे यांनी सांगितले, की आरक्षणविषयक समस्यांवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात बैठक आयोजित करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला गेला. अद्याप त्या प्रलंबित आहेत. राज्यातील बंजारा जमातीला इतर राज्यात मिळालेल्या संविधानिक सवलती प्राप्त झालेल्या नाहीत. परिणामी महाराष्ट्रातील बंजारा जमाती विकासापासून अद्याप दूर आहेत. ते राहत असलेल्या परिसरात कोणत्याही पायाभूत सुविधा नसल्याने समाजबांधव विकसित व शहरी भागाकडे स्थलांतरित होत आहेत. परिणामी महाराष्ट्रातील तांडे आज ओस पडत आहेत. राष्ट्रीय भटके विमुक्त आयोग व राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग यांच्या प्रसिद्ध सर्व अहवाल व शिफारशींमध्ये बंजारा जमातीस अनुसूचित जमाती किंवा जातीत समावेश करण्याच्या अनेक वेळा शिफारशी केलेल्या आहेत. या जमाती आदिवासींपेक्षाही हलाखीचे जीवन जगत असून, त्यांचे जीवनमान उंचावून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे असल्याचेही नमूद केले आहे. सध्याच्या रोहिणी व नीती आयोगाच्यासुद्धा अशाच प्रकारच्या शिफारशी आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही अनुसूचित जाती जमातीच्या यादीत विगतवारी वर्गवारी करण्याचा ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण निर्णय ऑगस्ट २०२४मध्ये घेतलेला आहे. त्यामुळे बंजारा जमातीला स्वतंत्र एसटी (बी) आरक्षण आदिवासींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता देण्यात यावे, अशी आमची प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी हजारोंच्या संख्येने बंजारा समाजबांधव मोर्च्यात सहभागी झाले होते. पोलिस प्रशासनातर्फे शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.
............
चौकट :
बंजारा समाजाच्या मागण्या
१. हैदराबाद गॅझेट बंजारा जमातीस लागू करावे.
२. स्वतंत्र एसटी (बी) आरक्षण लागू करावे.
३. बंजारा जमातीला अनुसूचित जमातीत समावेश करण्याची शिफारस लागू करावी.
४. महाराष्ट्रातील बंजारा जमातीला जनगणनेत विविध नावांऐवजी गोर (बंजारा) या एकाच नावाने संबोधित करून सवलती देण्यात याव्यात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com