डीएनएस बँकेकडून अधिकृत यूपीआय हँडलचे अनावरण

डीएनएस बँकेकडून अधिकृत यूपीआय हँडलचे अनावरण

Published on

डीएनएस बँकेकडून अधिकृत यूपीआय हँडलचे अनावरण
डिजिटल बँकिंगमध्ये महत्त्वपूर्ण पाऊल

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : डोंबिवली नागरी सहकारी बँकेने आपल्या डिजिटल परिवर्तनाच्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. बँकेने आपला अधिकृत युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस हँडलचे अनावरण केले आहे. हा उपक्रम सुरू करणारी डीएनएस बँक आता भारतातील काही निवडक सहकारी बँकांच्या समूहात सामील झाली आहे.

ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल २०२५ मध्ये डीएनएस बँकेच्या संचालक मंडळातील सदस्य, पदाधिकारी आणि ''गेटपे''चे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. या प्रसंगी डीएनएस बँकेचे संचालक मिलिंद अरोलकर म्हणाले, “हा क्षण केवळ डीएनएस बँकेसाठीच नव्हे, तर संपूर्ण सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी परिवर्तन घडवणारा आहे. आमचे उद्दिष्ट सुरक्षित, आधुनिक आणि सर्वसमावेशक डिजिटल बँकिंग सेवा प्रत्येक समाजघटकापर्यंत पोहोचवणे आणि इतर सहकारी बँकांना या वाटेवर प्रेरित करणे आहे.

''गेटपे'' चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण शर्मा म्हणाले, “डीएनएस बँकेसोबत ‘वेगा – द पेमेंट स्विच’द्वारे भागीदारी करताना आम्हाला अभिमान वाटतो. या माध्यमातून आम्ही सहकारी आणि प्रादेशिक बँकांना भविष्यासाठी तयार आणि विस्तारक्षम पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर प्रदान करत आहोत.”या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे डीएनएस बँकेने सुरक्षित डिजिटल सुविधा, ग्राहकसुलभता आणि आर्थिक सर्वसमावेशकतेच्या दिशेने आपली वचनबद्धता अधिक दृढ केली आहे आणि सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.

डीएनएस बँकेतर्फे सर्व सहकारी बँकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी डीएनएस बँकेसोबत भागीदारी करून आपल्या ग्राहकांसाठी क्यूआर आधारित पेमेंट सेवा सुरू कराव्यात आणि बँकेच्या अधिकृत यूपीआय हँडलद्वारे डीएनएस बँकेच्या क्यूआर सेवांमध्ये सहभागी व्हावे. सहकार्याच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत सुरक्षित डिजिटल सेवा पुरविण्यासाठी डोंबिवली नागरी सहकारी बँक कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com