थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई

थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई

Published on

तुर्भे झोपडपट्टीधारक विविध समस्यांमुळे त्रस्त
नेरूळ, ता. ११ (बातमीदार) : तुर्भे परिसरातील झोपडपट्टीधारकांना अनेक नागरी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात झोपडपट्टीधारक संघ तुर्भेचे अध्यक्ष शंकर पडुळकर यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांना १२ प्रमुख मागण्यांचे निवेदन दिले आहे. निवेदनानुसार, तुर्भे स्टोअर परिसरातील रस्त्यांवर अपघात झालेल्या मृतकांच्या वारसांना प्रत्येकी १५ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी. रस्त्यावरील तुटलेल्या गेटिंगची दुरुस्ती, महामार्गावरील खड्ड्यांचे निराकरण आणि अपघात प्रवण ठिकाणी गतिरोधकांची योग्य स्थापना ही मुख्य मागण्या केल्या आहेत. तसेच झेब्रा लाईन्स ठरवून पांढरा पट्टा मारणे, पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी लोखंडी रॅलींग बसवणे, तसेच ठाणे–बेलापूर मार्गावरील अपघात थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आदी सुचनादेखील करण्यात आल्या आहेत. शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी सांगितले की, प्राप्त तक्रारींवर संबंधित अभियंत्यांना सूचना देण्यात येतील व योग्य कार्यवाहीसाठी आदेश दिले जातील.
....................
मनसेतर्फे वाशी वॉर्ड ऑफिसवर ''टाळ वाजवा मोर्चा''
तुर्भे (बातमीदार) : वाशी प्रभागातील अनेक नागरी समस्यांचे निवारण न झाल्यामुळे नागरिकांच्या सहभागाने मनसेतर्फे वाशी वॉर्ड ऑफिसवर ''टाळ वाजवा मोर्चा'' काढण्यात आला. मनसे प्रवक्ते आणि शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोठ्या प्रमाणात महिला आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. मोर्चाच्या माध्यमातून नागरिकांनी खराब रस्ते, तुटलेले पदपथ, अतिक्रमण, उद्यानाची दूरवस्था, रस्त्यावर साचलेला घनकचरा अशा समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. वाशी बस डेपो तयार असूनही उद्घाटन करण्यात ढिलाई होत असल्याचे गजानन काळे यांनी अधिकारी वर्गाला सांगितले. बस डेपो अद्यापही सुरू न झाल्याने नागरिकांना राज्य महामार्गावर उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्‍यामुळे काळे यांनी बस डेपो लवकरात लवकर सार्वजनिक उपयोगासाठी खुला करावा, अन्यथा मनसे स्‍टाईल उद्घाटन करण्यात येईल, असे सांगितले. वाशी विभागाचे अधिकारी येडवे आणि इतर अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून मनसेच्या मागण्यांचा ताबडतोब आढावा घेतला.
.................
पनवेल चिंचपाडा येथील महिंद्रा पिकअप चोरी
पनवेल (बातमीदार) : पनवेल येथील चिंचपाडा गावात विठ्ठल मंदिराजवळील चार चाकी वाहनांच्या कार बॉडी शॉपमध्ये महिंद्रा कंपनीच्या पिकअप गाडीची चोरी झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ९) घडली. अशोक कुमार शर्मा यांच्या दुकानातील सफेद रंगाची महिंद्रा पिकअप क्र. एम. एच. ४६, ए एफ ४६४८ चोरट्याने चोरी केली. गाडीची किंमत सुमारे दोन लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून अधिक तपास करण्यात येत आहेत. दुकानात काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज देखील तपासले जात आहेत. पोलिस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. या घटनेमुळे परिसरातील वाहन सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे.
.....................
अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्यांची पालिकेला भेट
पनवेल (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी पनवेल महापालिकेत ९ ऑक्टोबर रोजी भेट देऊन अनुसूचित जातींसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा आढावा घेतला. आयुक्त मंगेश चितळे यांनी ॲड. लोखंडे यांचे स्वागत पुस्तक देऊन केले. भेटी दरम्यान ॲड. लोखंडे यांनी पालिकेच्या कामकाजाचे समाधानकारक स्वरूप असल्याचे व्यक्त केले. त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत माहिती घेतली आणि उपलब्ध सुविधांबाबत समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त, परिवहन व्यवस्थापक, उपायुक्त, मुख्य लेखा अधिकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, कार्यकारी आणि उपअभियंते तसेच महापालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते. आयोगाचे सदस्य लोखंडे यांनी पालिकेच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीस समाधान व्यक्त करत, पुढील सुधारणा आणि अधिक कार्यक्षम प्रशासनासाठी सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com