बुलेट ट्रेनच्या दहावा स्टील पुलाची उभारणी

बुलेट ट्रेनच्या दहावा स्टील पुलाची उभारणी

Published on

बुलेट ट्रेनच्या दहाव्या स्टील पुलाची उभारणी
अहमदाबाद जिल्ह्यातील पहिला पूल; सात तासांत काम पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील दहावा स्टील पूल गुजरातमधील अहमदाबाद येथे यशस्वीरीत्या उभारण्यात आला आहे. अहमदाबाद जिल्ह्यात उभारला गेलेला हा पहिलाच स्टील पूल असून, केवळ सात तासांत हे काम पूर्ण करण्यात आले.

६० मीटर लांबीचा हा पूल पश्चिम रेल्वेच्या सुविधांलगत उभारण्यात आला आहे. ट्रान्सव्हर्स लॉन्चिंगसाठी तो जमिनीपासून १६.५ मीटर उंचीवर उभारण्यात आला आहे. २०० टन क्षमतेच्या दोन अर्ध-स्वयंचलित जॅकच्या मदतीने हा पूल बाजूला सरकवण्यात आला. ४८५ मेट्रिक टन वजन, १२ मीटर उंची आणि ११.४ मीटर रुंदी असलेला हा पूल वर्धा (महाराष्ट्र) येथील वर्कशॉपमध्ये तयार करण्यात आला. त्यानंतर विशेष ट्रेलरच्या सहाय्याने तो अहमदाबादपर्यंत नेण्यात आला. पूल बांधकामासाठी २०,३६० उच्च ताकदीच्या टॉर-शियर बोल्ट्सचा वापर झाला असून, पूल दीर्घायुष्यासाठी सी-५ संरक्षणात्मक कोटिंग आणि कंपन नियंत्रणासाठी इलास्टोमेरिक बेअरिंग्ज वापरली गेली आहेत. मुख्य संरचनेच्या एकत्रीकरणासाठी ३५ बाय ६० मीटरचा तात्पुरता मंच तयार करण्यात आला होता. ट्रॅक बीम मजबूत करण्यासाठी अतिरिक्त ब्रॅकेट्स बसवण्यात आले, तर ट्रान्सव्हर्स लॉन्चिंगसाठी एकूण १४ स्किड व्यवस्था करण्यात आल्या.

एकूण २८ स्टील पूल
अहमदाबादमधील बुलेट ट्रेन वायडक्ट एकूण ३१ मार्ग ओलांडणार आहे. यात रेल्वे ट्रॅक, फ्लायओव्हर्स, कालवे, साबरमती नदीवरील पूल आणि सहा स्टील पुलांचा समावेश आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी २८ स्टील पूल बांधण्याचे नियोजन असून, त्यापैकी १७ गुजरातमध्ये आणि ११ महाराष्ट्रात उभारले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com