सभापतीपदासाठी खालापुरात चुरस
सभापतीपदासाठी खालापुरात चुरस
पंचायत समितीचे सर्वसाधारणसाठी आरक्षण
खालापूर, ता. १२ (बातमीदार)ः कोरोनानंतर राज्यातील सत्तांतराच्या घडामोडीमुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन वर्ष लांबणीवर पडल्या.
केवळ राजकारणासाठी वाहून घेतलेल्या अनेक नेते मंडळीची अवस्था अडगळीत पडल्यासारखी झाली आहे. पण निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारणसाठी जाहीर झाल्यानंतर सर्वच प्रमुख राजकीय पक्षात उत्साह संचारला आहे.
खालापूर तालुक्यातील खोपोली नगरपरिषद नगराध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती आरक्षण सर्वसाधारण साठी जाहीर झाले आहे. आरक्षण जाहीर होण्यापूर्वी पक्षातंर करणाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. २०१७ साली पंचायत समिती सभापती पद महिलेसाठी राखीव झाल्यानंतर निवडणुकीत महाविकास आघाडीने शिवसेनेची पंचवीस वर्षाची सत्ता उलथवून टाकत सभापती आणि उपसभापती पद मिळवले होते. परंतु, आठ वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून राजकीय वैरी दोस्त झाले आहेत. खालापूर तालुक्यात शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकासमोर उभे ठाकणार असून शिवसेना आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारेंमधील टोकाचा संघर्ष होणार आहे
चौकट-शिवसेनेचा अनेक वर्ष बालेकिल्ला असलेला खालापूर तालुका २०१७मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस आघाडीने बालेकिल्ल्याला सुरुंग लावला होता. आघाडीने प्रथमच जिल्हा परिषदेच्या चार पैकी तीन गटात विजय मिळवला तर पंचायत समिती ८ पैकी ५ जागा आघाडीने जिंकत पंचवीस वर्षाची सेनेची मक्तेदारी मोडीत काढली होती. शिवसैनिकासाठी हा मोठा धक्का होता . पाच वर्षापूर्वी शिवसेना स्वबळावर तालुक्यामध्ये निवडणूक लढली होती. आघाडी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस हे मोठे पक्ष एकत्र होते. शिवसेनेचे विभाजन झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाले असले तरी खालापूर तालुक्यात पक्षाला काही फरक पडलेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.