जेएनपीएमधील ‘ट्रॉमा केअर सेंटर’ सुरू करा
जेएनपीएमधील ‘ट्रॉमा केअर सेंटर’ सुरू करा
उरण सामाजिक संस्थेची मागणी; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
उरण, ता. १२ (वार्ताहर) : जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएनपीए) वसाहतीतील रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर त्वरित पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी उरण सामाजिक संस्थेने केली आहे. या मागणीमुळे जेएनपीए परिसरातील नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्यसेवेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिकेच्या सुनावणीत ३१ मार्च २०१९ रोजी जेएनपीए प्रशासनाला पूर्णता ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर जेएनपीएने आवश्यक सुविधा उभारल्या असल्या तरी कोविड-१९ महामारीनंतर हे केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले नाही. सध्या येथे फक्त प्रथमोपचार विभाग कार्यरत असून, गंभीर रुग्णांसाठी आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही. उरण सामाजिक संस्थेने उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा संदर्भ देत प्रशासनाला पत्राद्वारे विनंती केली आहे, की विलंब न लावता ट्रॉमा केअर सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू करावे. गेल्या चार ते सहा वर्षांत या विषयावर ठोस पावले न उचलल्याने रुग्ण आणि नागरिकांना वेळेवर उपचार न मिळण्याचे प्रकार घडत आहेत, असे संस्थेने नमूद केले आहे.
...............
जेएनपीए आणि उरण परिसर औद्योगिकीकरण व अवजड वाहतुकीसाठी ओळखला जातो. त्यामुळे या भागात वाहतूक अपघात, रासायनिक गळती, औद्योगिक दुर्घटना अशा घटना वारंवार घडतात. अशा वेळी तातडीच्या वैद्यकीय सेवांचा अभाव गंभीर ठरू शकतो. त्यामुळे ‘ट्रॉमा केअर सेंटर’ हे फक्त जेएनपीए कर्मचाऱ्यांसाठी नव्हे, तर आसपासच्या नागरिकांसाठीही जीवनरक्षक ठरणार असल्याचे मत सामाजिक संस्थेने व्यक्त केले आहे. संस्थेने जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांच्याकडे या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित प्रशासकीय प्रक्रिया गतिमान करावी आणि केंद्र कार्यान्वित करावे, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.