पावसाच्या भीतीने आले ‘वॉटरप्रूफ’ आकाशदिवे

पावसाच्या भीतीने आले ‘वॉटरप्रूफ’ आकाशदिवे
Published on

पावसाच्या भीतीने आले ‘वॉटरप्रूफ’ आकाशदिवे
दिवाळीनिमित्त बाजारपेठ सजली; रंगीबेरंगी लायटिंगसह नवीन ट्रेंडचे आकर्षण
नवीन पनवेल, ता. १२ (बातमीदार) : यंदा पावसाने अक्षरशः जनजीवन विस्कळीत केले असून, शेतकऱ्यांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत सर्वच क्षेत्रांवर त्याचा परिणाम झाला आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही पनवेलसह रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम होता. या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या तयारीतही पावसाचा विचार करावा लागत आहे. त्यामुळे यंदा बाजारपेठेत ‘वॉटरप्रूफ आकाशकंदील’ हे नवीन आकर्षण ठरत आहेत.
पनवेल शहरातील बाजारपेठ सध्या दिवाळीच्या जल्लोषात नटली आहे. गल्लीबोळात रंगीबेरंगी लायटिंगची सजावट, विविध आकारांचे दिवे, पारंपरिक तसेच आधुनिक डिझाइनचे कंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पावसाचे सावट लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी या वर्षी विशेष प्रकारचे वॉटरप्रूफ कंदील आणले आहेत, जे पावसातही टिकतात आणि खराब होत नाहीत. स्थानिक विक्रेते जयवंत साखरे यांनी सांगितले की, दरवर्षी नवनवीन आकाशदिवे बाजारात येतात. मात्र, यंदा सततच्या पावसामुळे ग्राहकांना टिकाऊ आणि सुरक्षित पर्याय हवा होता. त्यामुळे वॉटरप्रूफ आकाशकंदीलाना यंदा मोठी मागणी आहे. हे कंदील २५० ते ५०० रुपयांच्या दरम्यान उपलब्ध असून, ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
.............
जिलेटिन पेपरचा जुना ट्रेंड पुन्हा लोकप्रिय
पूर्वी जिलेटिन पेपरपासून तयार होणारे पारंपरिक आकाशकंदील दिवाळीची ओळख होती. नंतर फॅन्सी आणि प्लॅस्टिकच्या कंदीलांनी त्यांची जागा घेतली होती. परंतु यंदा जुन्या आठवणींना उजाळा देत ‘जिलेटिन पेपर कंदील’ पुन्हा बाजारात दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com