कल्याण अवती-भवती
भोईवाड्यात ओमसाई सेवा मंडळाच्या पालखीचे आगमन
कल्याण (वार्ताहर) : सालाबादप्रमाणे यंदाही ओमसाई सेवा मंडळ उरण करंजा येथील पालखीचे रविवारी (ता. १२) कल्याणच्या भोईवाडा येथे स्व. नामदेव कुंभारे यांच्या निवासस्थानी आगमन झाले. त्या वेळी कल्याण भोईवाडा येथे ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश कुंभारे यांनी त्यांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही निष्ठेने पार पाडली. या वेळी भोईवाड्यातील वार्ड क्रमांक ३५ चे शिवसेना युवासेना उपशहर प्रमुख मेघन सल्पी, भोई कोळी ज्ञाती समाजाचे माजी अध्यक्ष गणेश गुडदे, माजी नगरसेवक रमेश वाळुंज, रामचंद्र बाबडे, रोहन गुडदे, धनंजय गुडदे, धीरज गुडदे, सनी कुंभारे, मनीष भोपी, स्वयंम कुंभारे, भोईवाडा महिला मंडळ अध्यक्ष सुवर्णा कुंभारे आणि सर्व भोईवाड्यातील ग्रामस्थ मंडळी उपस्थित राहून या पालखीची शोभा वाढवली. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र सिंग गौड यांनी सपत्नीक पालखीचे दर्शन घेतले.
....................