मिठाईच्या दरात १० ते १५ टक्के वाढ
मिठाईच्या भावात १० ते १५ टक्के वाढ
दिवाळीनिमित्त दुकाने सज्ज
सकाळ वृत्तसेवा ः जीवन तांबे
दिवाळी काहीच दिवसांवर येऊन ठेपला असून, मिठाईच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी लगबग सुरू आहे. यंदा मिठाईच्या दरात साधारणपणे १० ते १५ टक्के वाढ झाली असून, काजू बर्फी, सोनपापडी, मलई तलोटा, मावा मिक्स बर्फीप्रमाणे सुक्या मेव्यापासून बनवलेल्या मिठाईलाही यंदा बाजारात अधिक मागणी आहे.
महाराष्ट्रात दिवाळी सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाला मिठाईला मोठी मागणी असते. सध्या मिठाईच्या दुकानात गुजिया, बालूशाही, विविध प्रकारचे गुलाबजाम, रसमलाई, मँगो रसमलाई, सँडविच, रोझ सँडविच, रसगुल्ला यांना काही प्रमाणात मागणी असली तरी काजू बर्फी, सोनपापडी, मलई तोलाटा, मिक्स बर्फी व साखर नसलेल्या मिठाईला ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळत आहे.
करंडा, टोपली, बटवा अशा आकारात सजावट केलेले ड्रायफ्रूट बाजारपेठांमध्ये ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पिस्ता, ऑरेंज, पायनापल, गुलकंद, बेसनाचे लाडू, गुलाबजाम, काजू कतली, चॉकलेट्स, ड्रायफ्रूट मिठाईंचा यात समावेश आहे.
परदेशातील नातेवाइकांना मिठाई पाठवण्यासाठी ऑनलाइन ऑर्डर केली जाते. एकीकडे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. महागाईचा परिणाम मिठाई व ड्रायफ्रूटच्या भावावर होत असला तरीही ग्राहकांनी मिठाई खरेदीसाठी मिठाईच्या दुकानांमध्ये आतापासूनच गर्दी केली आहे. त्यामुळे दिवाळी सणाला मिठाईच्या विक्रीत कोटींची उलाढाल होण्याची शक्यता मिठाई विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
दिवाळीत मिठाईला खूप मागणी असल्याने, भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाची मिठाई विकली जाण्याचा धोका वाढतो आहे. त्यामुळे ग्राहकांनी मिठाई खरेदी करताना काळजी घ्यावी
- डॉ. महादेव गारळे
शल्य चिकित्सक, केईएम रुग्णालय
गणेश चतुर्थी, दसरा सणाला मिठाईला मोठी मागणी असते. दिवाळी सण जवळ आला आहे. त्यामुळे आतापासूनच मिठाईला मागणी वाढत आहे.
- श्रीनाथ पैय्याडे, मिठाईविक्रेते
असे आहेत भाव
१. काजू कतली
प्रतिकिलो-१,३०० रुपये
२. काजू कमल, काजू ॲपल, काजू खरबूजा, काजू टकोज, काजू अंजीर, काजू ड्रायफ्रूट्स, केशर काजू, काजू अंजीर रोल, काजू कसाटा
प्रतिकिलो - १,५२० रुपये
३. मोतीचूर लाडू - प्रतिकिलो ८०० रुपये
४. मावा बर्फी - प्रतिकिलो ८०० रुपये
५. सोनपापडी -प्रतिकिलो ८८० रुपये
६. सुकामेवा बर्फी - प्रतिकिलो १,५०० रुपये,
७. मावा मिक्स बर्फी प्रतिकिलो- ८८० रुपये
८. मलई सँडविच प्रतिनग - ५० रुपये
९. रसगुल्ला प्रतिनग - ५० रुपये
१०. ड्रायफ्रूट बर्फी, रोझ बर्फी
प्रतिकिलो - १,५२० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.