कर्मवीर प्रतिष्ठानतर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात
कर्मवीर प्रतिष्ठानतर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात
कल्याण येथे धम्म परिषद, सामूहिक धम्मदीक्षा सोहळा
कल्याण, ता. १३ (बातमीदार) : कर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त रविवारी (ता. १३) तीसगाव पाडा येथे धम्म परिषद आणि सामूहिक धम्मदीक्षा सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे समाजसेवक प्रशांत बनसोडे यांनी या प्रेरणादायी सोहळ्याचे नियोजन केले होते. या सोहळ्याला भन्ते गौतम रत्न महाथेरो यांच्यासह वंदनीय भिक्षू संघाची उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी धम्म परिषद आणि आंबेडकरी विचारधारेवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. यातून उपस्थितांना विशेष मार्गदर्शन मिळाले. समाजात नवचैतन्य निर्माण करणाऱ्या या सामूहिक धम्मदीक्षा सोहळ्यात अनेक नागरिकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व समाजासमोर मांडणे आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचा प्रसार करणे, हा या सोहळ्यामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजक प्रशांत बनसोडे यांनी सांगितले.
सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध वारकरी कीर्तनकार ह.भ.प.श्री. ज्ञानेश्वर माउली वाबळे यांचे समाज प्रबोधनात्मक कीर्तन. त्यांनी आपल्या कीर्तनातून समाजाला बुद्ध आणि विठ्ठलाचे एकत्रित दर्शन घडविले. माउली वाबळे यांनी स्त्री-पुरुष समानता, मनुष्याचे आचरण, भोंदूबाबांची बुवाबाजी, अंधश्रद्धा निर्मूलन, आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान आणि शिक्षणाचे महत्त्व अशा महत्त्वाच्या सामाजिक विषयांवर प्रबोधन केले. त्यांनी भारुडपर गीतांचाही समावेश केला. विशेषतः तरुणांना उद्देशून त्यांनी ‘व्यसनं सोडा, व्यसनापायी कित्येक संसार उघड्यावर आलेत,’ असा कठोर आणि स्पष्ट संदेश दृष्टांताच्या माध्यमातून दिला. अनेक दशकांपासून संत परंपरा आणि सामाजिक समतेचा प्रसार करणारे माउली वाबळे यांच्या कीर्तनाने श्रोते भारावून गेले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.