महिला बचत गटांच्या उत्पादनांना पसंती
महिला बचत गटांच्या उत्पादनांना पसंती
पोयनाड, ता. १३ (बातमीदार) : दिवाळी म्हटले की पणत्या, आकाश कंदील, फटाके यांच्यासह विविध फराळाच्या पदार्थांची रेलचेल असते. आता बदलत्या काळानुसार घराघरांमध्ये फराळ बनवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याउलट आता नोकरदारवर्ग आणि महिला रेडिमेड तयार फराळाला पसंती देत आहेत. त्यामुळे महिल बचत गटांच्या रेडिमेड फराळाला बाजारात प्रचंड मागणी वाढली आहे.
अलिबाग तालुक्यातील पोयनाड बाजारपेठ ही विविध वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. या बाजारपेठेत फराळाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात विक्री होतात. आता यंदाच्या दिवाळीत पोयनाड बाजारपेठेत महिला बचत गटांच्या उत्पादनांना ग्राहकांकडून प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. पोयनाडजवळील धनलक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता बचत गट आणि सप्तशृंगी महिला बचत गटांनी दिवाळी फराळ तयार करून बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. एरवी पापड, जेवण वाढण्याचे काम, हळदी समारंभातील वडे, जेवणाची ऑर्डर यांसारखी कामे ही बचत गट करतात, पण आता दिवाळीसाठी फराळ उत्पादनात या बचत गटातील महिलांनी पाऊल उचलले आहे. फराळ उत्पादनात चकली पीठ आणि अनारसे पीठ यांचे उत्पादन या महिला करतात. चकली पीठ १६० रुपये किलो आणि अनारसे पीठ १७० रुपये किलो या दराने याची विक्री होते. या बचत गटाच्या महिलांची उत्पादने पोयनाड, पेण, उरण, अलिबाग या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवतात. ग्राहक महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना मोठी पसंती देताना दिसून येत आहेत.
.........................
चौकट :
उमेदचे सहाय्य
- प्रामुख्याने या बचत गटातील महिलांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजे उमेदचे पाठबळ लाभते. याद्वारे महिला बचत गटांना त्यांची उत्पादने स्थानिक आणि मोठ्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठबळ मिळते. तसेच प्रदर्शनांमध्ये उत्पादन विक्रीसाठी ठेवले जाते.
...............
बाजारपेठ उपलब्ध नसल्याची समस्या
- बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना स्थानिक बाजारपेठ वगळता इतर जागा उपलब्ध नसल्याने स्थानिक स्तरावरच उत्पादने विक्री करावी लागतात ही त्यांची मोठी समस्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.