अंबिया बहराचा पीकविमा काढा कृषी विभागाचे अवाहन
अंबिया बहराचा पीकविमा काढाः कृषी विभागाचे आवाहन
पनवेल, ता. १३ (बातमीदार) ः नैसर्गिक वातवरणीय बदलचा फळ पिकांच्या उत्पादनावर परिणाम होतो. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. यासाठी राज्यात फळपिक विमा योजना राबवली जात असून अंबिया बहरासाठी लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
आंबिया बहारमध्ये काजू, आंबा या फळपिकांसाठी महसूल मंडल स्तरावर फळपिक विमा योजना राबविण्यात येते. नुकसान भरपाईची रक्कम हवामान केंद्राच्या नोंदीनुसार निश्चित केली जाते. कृषी विभागाच्या वतीने पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन २०२४-२५, २६ या वर्षांसाठी लागू करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार असून, विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. ही योजना राज्य कृषी विमा कंपनी लिमिटेड मार्फत राबविण्यात येणार आहे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
यासाठी शेतकऱ्यांनी आपले नाव, ७/१२ उतारा, आधारकार्ड, आणि फळपिक बागेचा जिओ-टॅगिंगसह फोटो सादर करून नोंदणी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी हप्ता भरताना जवळच्या बँक, सीएससी सेंटर किंवा पीएम फसल विमा योजना पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.