स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये एकविचाराचे सरकार येणे गरजेचे
एकविचाराचे पक्ष सत्तेवर येणे गरजेचे
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन
कल्याण, ता. १३ (वार्ताहर) : पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या नेतृत्वात, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकविचाराचे राजकीय पक्ष सत्तेवर येणे हे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी या भागांमध्ये आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येक भागात जनसंपर्क कार्यलये व्हावीत, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. कल्याण पूर्वेतील पिसवली येथे केडीएमसीचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, जगन्नाथ पाटील, आमदार सुलभा गायकवाड, निरंजन डावखरे, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष नंदू परब, नरेंद्र सूर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक प्रभागात कार्यालय त्याप्रमाणे नवीन पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या प्रवेशाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक प्रभागात भारतीय जनता पार्टी जनसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी ही कार्यलये महत्त्वाची आहेत. त्याच धर्तीवर माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या पिसवली प्रभागात आणखी एका कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मोरेश्वर भोईर हे भाजप पक्षाचे तळमळीचे कार्यकर्ते आहेत. पक्षसंघटना मजबूत कशी होईल, याचा फायदा नागरिकांना कसा होईल, या हेतूने ते काम करत असतात. पक्षाने त्यांची दखल घेऊन त्यांना उपमहापौरपद दिले. त्या पदाला त्यांनी न्यायदेखील दिला. तसेच नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्येक प्रभागात भाजपचे जनसंपर्क कार्यलय असणे आवश्यक असल्याचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे म्हणणे असून, त्याप्रमाणे हे कार्यालय सुरू झाले असून, या ठिकाणी नागरिकांना न्याय मिळेल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला.
मोठ्या मताधिक्याने विजय होईल
पिसवली प्रभागात भाजपचे चांगले कार्य असून, या ठिकाणी कार्यलय नव्हतं. मलंग रोड येथे असलेल्या कार्यलयात नागरिकांना यावे लागत होते. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन पिसवली येथे कार्यालय सुरू केले आहे. भाजपचे पंडित दीनदयाळ उपध्याय यांचा अंत्योदय विकास हा मूलमंत्र होता. शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे. तो प्रयत्न या कार्यालयाच्या माध्यमातून होणार आहे. हे जनसंपर्क कार्यालय जनतेच्या सेवेचं कार्यालय होणार असल्याचे मोरेश्वर भोईर यांनी सांगितले. तसेच पिसवली आणि आसपासच्या प्रभागात भाजपचे चांगलं काम असल्याने मोठ्या मताधिक्याने भाजपचा विजय होईल, असा विश्वास भोईर यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.