दिवाळीपूर्वीच भिवंडीत निवडणुकीचे पडघम सुरू
भिवंडी, ता. १३ (वार्ताहर) : दिवाळीपूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे येथे झालेल्या पंचायत समिती सभापती आरक्षण सोडतीत भिवंडी पंचायत समिती सभापतिपद अनुसूचित जमाती महिलेसाठी नुकतेच राखीव झाले होते. त्यानंतर आता सोमवारी (ता. १३) कामतघर येथील वऱ्हाळ माता मंगल हॉल येथे उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीच्या ४२ गणांसाठी आरक्षण सोडत पार पडली. यावेळी अनेक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जातीसाठी दोन, अनुसूचित जमातीसाठी आठ, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ११ आणि सर्वसाधारण २१ अशा जागा आहेत. यापैकी २१ जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. ही आरक्षण सोडत पार पडण्यासाठी निवासी नायब तहसीलदार विशाल इंदुलकर, आदेश म्हात्रे, सहाय्यक महसूल अधिकारी किरण केदार, अतुल नाईक, महसूल सहाय्यक आनंद पवार यांनी विशेष मेहनत घेतली.
आरक्षण तपशील
अनुसूचित जाती (२)
कोन पूर्व – अनुसूचित जाती (महिला)
शेलार – अनुसूचित जाती
अनुसूचित जमाती (आठ)
अकलोली, शिरोळे, कोलीवली, पायगाव : अनुसूचित जमाती (महिला)
गणेशपुरी, मोहंडूळ, अनगाव, कुहे : अनुसूचित जमाती
नागरिकांचा मागास प्रवर्ग (११)
झिडके, कुरुंद, शिवनगर, कवाड खु, खोणी २, कांबे : महिला राखीव
पडघा, काटई, वडुनवघर, काल्हेर, मानकोली : नागरिकांचा मागास प्रवर्ग
सर्वसाधारण (२१)
बोरिवली तर्फे राहूर, भादाणे, आमणे, धामणगाव, दाभाड, खोणी १, खारबाव, कारिवली, राजनोली, गोवे : सर्वसाधारण महिला
अंबाडी, चावे, महापोली, खोणी ३, राहनाळ, केवणी, कशेळी, पूर्णा, अंजूर, वेहळे, कोन पश्चिम : सर्वसाधारण