पालिकेकडून विकासकामांचा धडाका

पालिकेकडून विकासकामांचा धडाका

Published on

पालिकेकडून विकासकामांचा धडाका
शहरातील अर्धवट कामांसह ड्रेनेज लाइनची दुरुस्ती
वाशी, ता. १३ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पावसाळ्यानंतर शहरातील विविध विकासकामांना पुन्हा गती मिळाली आहे. पावसाळ्यातील खोदकामांवरील बंदी हटवल्यानंतर महापालिकेने रस्त्यांची खोदाई, पाइपलाइन बदलणे, गॅस व वीजवाहिन्यांची बदली तसेच ड्रेनेज लाइनची दुरुस्ती अशा कामांना मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली आहे. या कामांचा विस्तार दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, नेरूळ, बेलापूर या पालिकेच्या सर्व प्रमुख प्रभागांमध्ये दिसून येत आहे.
महापालिकेच्या नियमांनुसार, दरवर्षी १५ मेपासून खोदकामांसाठी परवानगी बंद केली जाते, तसेच २५ मेपासून सर्व खोदकामे पूर्णपणे थांबवली जातात. ३० सप्टेंबरपर्यंत पावसाळ्यातील खड्डे आणि खोदलेल्या रस्त्यांमुळे अपघात व वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो, म्हणून खोदकामे थांबवली जातात. मात्र पावसाळ्यानंतर हवामान स्थिर होताच आणि कडक उन्हाळा सुरू होताच महापालिकेने पुन्हा सर्व विकासकामांना परवानगी दिली. सध्या शहरात फक्त रस्तेदुरुस्ती नव्हे, तर जुन्या जलवाहिन्या बदलणे, गॅस पाइपलाइन टाकणे, पथदपथ व गटार दुरुस्ती, स्मार्ट सिटी प्रकल्पांची कामेदेखील जोरदार सुरू आहेत. ऐरोली-काटई उन्नत मार्ग व ऐरोली-घणसोली मार्ग यांची कामेदेखील प्रगतिपथावर आहेत. यामुळे नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल तसेच भविष्यातील पावसाळ्यात अडचणी कमी होतील, असे पालिकेच्या वतीने सांगितले जात आहे.
..................
कंत्राटदारांना सूचना
महापालिकेतील अभियंत्यांनी सांगितले, की या कामादरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य साइनबोर्ड, बॅरिकेड्स व लायटिंग लावण्याचे आदेश सर्व कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची स्थिती तत्काळ पूर्ववत केली जाईल, जेणेकरून नागरिकांना होणारी अडचण कमी करता येईल. दरवर्षी पावसाळ्यानंतर विकासकामांना गती देण्याची प्रक्रिया सुरू असते. यावर्षीदेखील पाणीपुरवठा व ड्रेनेज लाइनचे काम सर्व विभागांत प्राधान्याने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुकर वाहतुकीसाठी आवश्यक सुविधा लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com