पाऊस थांबताच धुळीने घेतला रस्त्यांचा ताबा

पाऊस थांबताच धुळीने घेतला रस्त्यांचा ताबा

Published on

धुळीने घेतला रस्त्यांचा ताबा
वाहन चालवणे कठीण; कासा ते उधवा सिमेंट रस्त्याच्या कामाला वेग
कासा, ता. १३ (बातमीदार) ः पावसाचा जोर कमी होताच कासा ते उधवा या मुख्य मार्गावरील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे, मात्र या कामामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिक, वाहनचालक आणि व्यापारी अक्षरशः हैराण झाले आहेत. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अधिकच धोकादायक ठरत आहे.
रस्त्याच्या दुतर्फा सिमेंट टाकणे, मातीचे खोदकाम आणि अवजड वाहनांची सततची ये-जा यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दिवसभर ट्रक, डम्पर, मिक्सर यांचा वावर सुरू असल्याने वातावरणात धूळ पसरली आहे. ही धूळ नाकातोंडात गेल्याने नागरिकांना श्वसनासंबंधी त्रास जाणवू लागला आहे, तर वाहनचालकांच्या डोळ्यात धूळ जात असल्याने छोटे-मोठे अपघात घडत आहेत. याशिवाय धुळीने व्यापारांचेही मोठे नुकसान होताना आहे. रस्त्याकडेला असलेल्या हॉटेलकडे नागरिक पाठ फिरवताना दिसत आहे.
याबाबतीत बांधकाम विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद दिला नाही.

अवजड वाहनांना बंदी तरीही वाहतूक सुरूच
स्थानिक प्रशासनाने या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घातली असली तरी रात्री-अपरात्री डम्पर आणि ट्रक निर्भयपणे फिरताना दिसतात. त्यामुळे केवळ धूळच नव्हे तर अपघातांचा धोकादेखील वाढला आहे. नागरिकांनी प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

दुकानांमध्ये आणि घरांमध्ये धूळ
रस्त्याचे काम सुरू असताना पाणी शिंपडले जात नाही. धुळीमुळे श्वसनाचे त्रास वाढले आहेत. मुलं आणि वृद्धांना बाहेर पडणं अवघड झालं आहे. दुकानांमध्ये आणि घरांमध्ये धूळ साचली आहे. काही ठिकाणी अवजड वाहनांमुळे मातीचा रस्ता खचून खड्डे पडतात. असे खड्डे वेळीच बुजवले जात नसल्याने दुचाकीस्वारांचा तोल जात असल्याचे प्रकार घडले असल्याचे स्थानिक सांगतात.

सध्या या मुख्य रस्त्याचे काम जोरात सुरू असून, पूर्ण होईपर्यंत नागरिक आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागणार आहे, मात्र ठेकेदाराने काळजी घेणे आवश्यक आहे. रस्त्यावर पाणी शिंपडणे, खड्डे त्वरित बुजवणे आणि सूचनाफलक लावणे या गोष्टी तातडीने करणे गरजेचे आहे.
- प्रशांत सातवी, सरपंच, वाघाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com