जिल्हा परिषदेच्या सदस्यपदाची आरक्षण सोडत जाहीर

जिल्हा परिषदेच्या सदस्यपदाची आरक्षण सोडत जाहीर

Published on

राजकीय समीकरणांना वेग
जिल्हा परिषदेच्या सदस्यपदाची आरक्षण सोडत जाहीर
अलिबाग, ता.१३ (वार्ताहर)ः जिल्हा परिषदेच्या गट-गण आरक्षणांची महिलांसाठी ५० टक्के आरक्षण नियमांनुसार जिल्हा परिषदेच्या एकूण ५९ गटाची सोडत काढण्यात आली. या सोडतीमुळे विद्यमान सदस्यांना आपले निवडणुकीचे क्षेत्र बदलावे लागणार आहे, तर काही नवीन चेहरे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोडतीनंतरच राजकीय समीकरणांना खऱ्या अर्थाने वेग आला आहे.
सोडत काढल्यानंतर लगेचच प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली, या प्रारूप आरक्षणावर १४ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत, तर ​अंतिम आरक्षणावर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून ३ नोव्हेंबर रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवजिल्हा परिषदेच्या एकूण ५९ गटांच्या सदस्यपदाचे आरक्षण सोमवारी (ता.१३) जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर करण्यात आले. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत सोडत पद्धतीने आरक्षण काढण्यात आले. या वेळी एकूण ५९ गटांच्या सदस्यपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये एकूण ३० जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी २ जागा, अनुसूचित जमातीसाठी ९ जागा व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १५ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उर्वरीत गट हे खुल्या प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आले.
-----------------------
अनुसूचित जाती- गोरेगाव
अनुसूचित जाती महिला- पाली देवद
अनुसूचित जमाती - महलमिऱ्या डोंगर, कळंब, राबगाव, नेरे
अनुसूचित जमाती महिला- जिते, मोठे वेणगाव, कशेळे, बोर्लीपंचतन, चौक
----
ओबीसी- केळवणे, काविर, दासगाव, जासई, चिरनेर, कडाव, कापडे बु.
----
ओबीसी महिला- आंबेवाडी, घोसाळे, वावंजे, वावेघर, बिरवाडी, खरिवली, रहाटवळ, चेंढरे
---
सर्वसाधारण- आवास, चौल, शहापूर, पाबरे, दादर, वडखळ, पांगरुळ, निजामपुर, वासांबे, सावरोली, राजपुरी, भुवनेश्वर, नागोठणे, मार्बा
---
सर्वसाधारण महिला- गव्हाण, माणगाव तर्फे वरेडी, आत्करगाव, चाणजे, तळाशेत, शिहू, जांभूळपाडा, नवघर, चरई, नेरळ, कोर्लई, पळस्पे, आंबेपूर, थळ, वडघर
ः------------------------------
पेणमध्ये पाच जिल्हा परिषद व दहा पंचायत समितीचे आरक्षण जाहीर
पेण, ता.१३ (वार्ताहर): रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत चिठ्ठी टाकून काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या पेण तालुक्यातील जिते- अनु- जमाती महिला, दादर- सर्वसाधारण, वडखळ- सर्वसाधारण, महलमिऱ्या डोंगर- अनु-जमाती, शिहू- सर्वसाधारण महिला अशा ५ गटासाठी आरक्षण जाहीर करून पंचायत समितीच्या १० गणाकरीता जिते- सर्वसाधारण, वाकरुळ- अनु- जमाती महिला, रावे- सर्वसाधारण महिला, दादर- नामाप्र महिला, वाशी- सर्वसाधारण, वडखळ- सर्वसाधारण, महलमि-या डोंगर- अनु- जमाती, वडगांव- सर्वसाधारण महिला, डोलवी- सर्वसाधारण महिला, शिहू- नामाप्र हे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे पेण पंचायत समितीवर पुन्हा महिलाराजच सभापतीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता आहे.
ः--------------------------------------
स्थानिक राजकारणात चुरस
माणगाव (वार्ताहर) तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यपदासाठी आरक्षण जाहीर झाले असून विविध मतदारसंघांमध्ये आरक्षणाच्या बदलांमुळे स्थानिक राजकारणात चुरस निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषद गट क्रमांक ४५ निजामपूर हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव राहणार आहे. त्याखालील पंचायत समिती मतदारसंघांपैकी निजामपूर हा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी, तर पाटणूस हा नागरिक मागासवर्ग (ना.म. प्रवर्ग) राखीव ठरला आहे. जिल्हा परिषद गट क्रमांक २६ तळाशेत हा सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी राखीव ठरला असून पंचायत समितीतील तळाशेत हा ना.म. प्रवर्ग महिला आणि साई हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. जिल्हा परिषद गट क्रमांक ४७ मोर्बा हा सर्वसाधारण प्रवर्गात राहिला असून त्याखालील पंचायत समिती मोर्बा ही सर्वसाधारण महिला आणि मांजरवणे ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठरली आहे. तर जिल्हा परिषद गट क्रमांक ४८ गोरेगाव हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असून पंचायत समिती गोरेगांव ही सर्वसाधारण महिला आणि लोणेरे ही सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com