जिल्हा परिषदेमध्ये अनुसूचित जमातींचे वर्चस्व
पालघर, ता. १३ : जिल्हा परिषदेच्या ५७ प्रभागांकरिता आरक्षणाची सोडत सोमवारी (ता. १३) जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाहीर आत्माराम पाटील सभागृहात पार पडली. जिल्हा परिषदेत ३७ अनुसूचित जमाती, १५ ओबीसी, चार सर्वसाधारण, तर एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव जाहीर झाली आहे. पालघर जिल्हा परिषदेमध्ये अनुसूचित जमातींचे वर्चस्व प्रस्थापित होणार असल्याचे चित्र आहे.
अनुसूचित जमातींसाठी राखीव झालेल्या ३७ जागांपैकी १९ जागा महिलांसाठी राखीव आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसीच्या एकूण १५ जागा होत्या. त्यामध्ये आठ जागा महिलांसाठी आरक्षित केल्या गेल्या. सर्वसाधारण असलेल्या चारपैकी एक जागा महिलांसाठी राखीव झाली, तर तीन जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. जिल्ह्यात एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव झाली. जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखाड, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी रणजित देसाई, जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आदींच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांकडून ही सोडत काढण्यात आली.
प्रभागनिहाय आरक्षण
- अनुसूचित जाती : पास्थळ गट
- अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : जव्हारमधील विनवळ, डहाणूतील आंबेसरी, बोर्डी, चारोटी, आशागड, कैनाड, दाभोन, तलासरीतील उपलाट, वसा, वडवली, विक्रमगडमधील कुरझे, मलवाडा, पालघरमधील हाळोली, धुकटण, वसईतील भाताने, वाडा येथील गालतरे.
- अनुसूचित जमाती (महिला) : जव्हार तालुक्यातील वावर, झाप, जव्हार ग्रामीण, विक्रमगडमधील दादडे, तलवाडा, डहाणूतील मोडगाव, आंबोली, तलासरीतील सूत्रकार चळणी, डोंगारी, पालघरमधील बऱ्हाणपूर, शिगाव, मोखाड्यातील खोडाळा, आसे, पोशेरा, आलोंढे, भिसेनगर, वाडा येथील गांधारे, खनिवली.
- नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : सातपाटी, कुडूस, मनोर, तारापूर, बोईसर वंजारवाडा, चंद्रपाडा, चिंचणी
- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : दांडी, एडवण, खैरापाडा, केळवा, उंबरपाडा नंदाडे, बोईसर, माहीम, अर्नाळा किल्ला
- सर्वसाधारण प्रवर्ग : कळंब, धाकटी डहाणू, खुपरी
- सर्वसाधारण प्रवर्ग महिला : सरावली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.