दिवाळीची सुरेल गझल पहाट शनिवारी रंगणार

दिवाळीची सुरेल गझल पहाट शनिवारी रंगणार

Published on

दिवाळीची सुरेल गझल पहाट शनिवारी रंगणार

मुंबईत गझलनवाज भीमराव पांचाळे यांची खास स्वरमैफल

मुंबई, ता. १३ : दिवाळीच्या मंगल सकाळी शहरवासीयांना एक आगळीवेगळी सुरेल मैफल अनुभवता येणार आहे. सकाळ माध्यम समूहातर्फे गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या सुरांची सोनेरी ‘गझल पहाट’ शनिवारी (ता. १८) प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात सकाळी ६.३० वाजता ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.
या मैफलीत सुप्रसिद्ध गझलकार गझलनवाज भीमराव पांचाळे गझलच्या नाजूक शब्दसौंदर्याची नजाकत त्यांच्या स्वरांत गुंफून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहेत. पहाटेच्या शांत, प्रसन्न वातावरणात त्यांच्या गझलांचा सुरेल प्रवास हा दिवाळीच्या प्रकाशोत्सवास एक नवी आत्मीय झळाळी देणार आहे.
पाच दशकांहून अधिक काळ आपल्या आवाजाने मराठी गझलेला जनमानसात पोहोचविणारे भीमराव पांचाळे हे नाव आज गझलप्रेमींसाठी भावविश्वाचा अविभाज्य भाग बनले आहे. असंख्य लोकप्रिय गझलांनी त्यांनी श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
गझल रसिकांसाठी ही मैफल म्हणजे सुरेल, भावस्पर्शी आणि चिंतनशील शब्दांची पर्वणीच ठरणार आहे. गझलनवाज भीमराव पांचाळे हे गेल्या ५० वर्षांपासून गझल गायन करीत असून, त्यांच्या मैफली फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशविदेशातही गाजल्या आहेत. मराठी गझल परंपरेला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या या ज्येष्ठ कलावंताच्या सादरीकरणाचा आनंद घेण्यासाठी रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
खास दिवाळीनिमित्त होणारी ‘दिवाळी गझल पहाट’ केवळ एक संगीत मैफल नसून, सांस्कृतिक सौंदर्य, काव्यात्म भावना आणि आध्यात्मिक स्पर्श अनुभवण्याची पर्वणी ठरणार आहे. सकाळच्या पहिल्या किरणांसोबत सुरावटींच्या या दिव्य झंकारात सहभागी होण्यासाठी रसिकांनी ‘बुक माय शो’वर आपली तिकिटे आरक्षित करावीत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
---
- कुठे ? : रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी
-️ कधी ? : शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५
- केव्हा ? : सकाळी ६.३० वा.

तिकिटे ‘बुकमाय शो’वर उपलब्ध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com