78 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची व्यापक पूर्वतयारी

78 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची व्यापक पूर्वतयारी

Published on

७८व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची व्यापक पूर्वतयारी
मुंबईसह महाराष्ट्रातील हजारो स्वयंसेवक समर्पित करीत आहेत त्यांच्या निष्काम सेवा

कल्याण, ता. १५ (वार्ताहर) : संत निरंकारी मिशनचा ७८वा वार्षिक संत समागम गतवर्षाच्या दिव्यता आणि गौरवशाली परंपरेशी सुसंगत राहून या वर्षीही ३१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाना) येथे अत्यंत भव्यरूपात श्रद्धापूर्ण आणि आध्यात्मिक उत्साहात साजरा होणार आहे. हा दिव्य सोहळा सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पवित्र सान्निध्यात संपन्न होणार असून, या आनंदवार्तेने सर्व श्रद्धाळू भक्तांच्या अंत:करणात अगणित हर्ष आणि आध्यात्मिक ऊर्जा संचारली आहे.

या वर्षीचा वार्षिक समागम ‘आत्ममंथन’ या विषयावर आधारित आहे. हा समागम म्हणजे भक्तांसाठी एक अद्वितीय आध्यात्मिक प्रवास आहे, जिथे ते ब्रह्मज्ञानाच्या आत्मिक प्रकाशात सेवा, नामस्मरण आणि सत्संगाच्या माध्यमातून आनंद व प्रेमाभक्तीचा अनुभव घेतील.

या दिव्य उत्सवाची तयारी अत्यंत श्रद्धा, निष्ठा आणि निस्वार्थ भावनेने केली जात आहे. श्रद्धाळू भक्तगण वयस्कर असो वा युवा, पुरुष असो किंवा स्त्रिया सर्वजण मनोभावे सेवेत मग्न आहेत. समागमस्थळी पहाटेच्या पहिल्या किरणापासून ते सायंकाळच्या संध्या प्रकाशापर्यंत प्रत्येक ठिकाणी भक्तिभावाने समर्पित सेवेचे अलौकिक दृश्य दिसून येत आहे. इथे कोणी माती उचलत आहे, कोणी निवासी तंबू बांधत आहे, कोणी स्वच्छता करत आहे तर कोणी पाणीपुरवठा व भोजन व्यवस्थेची सेवा पाहतो आहे. मुंबई व महाराष्ट्रातून हजारो स्वयंसेवक समागमाच्या पूर्वतयारीसाठी आपल्या निष्काम सेवा समर्पित करीत आहेत.

७८व्या वार्षिक संत समागमाची भव्यता दर्शविणारे मुख्य प्रवेशद्वारही आता आकार घेऊ लागले आहे, जे प्रेम, समरसता आणि आत्मिक एकत्वाच्या यात्रेचे प्रतीक ठरणार आहे. हे सर्व त्या समर्पण भावनेचे प्रमाण आहे, जी सतगुरूंच्या ज्ञानातून उत्पन्न होते. जसे म्हटले गेले आहे, की जिथे सेवेत समर्पण असते तिथे प्रत्येक क्षण उत्सव बनतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com