मुंबई
अण्णासाहेब वर्तक कनिष्ठ महाविद्यालयाचा हँडबॉल संघ विजेता
अण्णासाहेब वर्तक कनिष्ठ महाविद्यालयाचा हँडबॉल संघ विजेता
विरार, ता.१५ (बातमीदार) ः जिल्हा क्रीडा अधिकारी, वसई विरार शहर महानगरपालिका जिल्हा आयोजित १९ वर्षाखालील मुले हँडबॉल स्पर्धेत अण्णासाहेब वर्तक कनिष्ठ महाविद्यालय, वसईचा संघ विजयी ठरला. अंतिम सामन्यात या संघाने सेठ विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचा पराभव करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचा संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. संघाच्या या विजयाबद्दल प्राचार्य, शिक्षकवृंद व क्रीडाशिक्षकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले असून विभागीय स्पर्धेतही उत्तम कामगिरी करील, असा विश्वास व्यक्त केला आहे.